तरुणांसाठी नेव्हीमध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी; असा करा अर्ज

तरुणांसाठी नेव्हीमध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी; असा करा अर्ज

अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 मे पासून सुरू झाली असून, उमेदवार 29 मे पर्यंत अर्ज करू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मे : भारतीय नौसेनेत जाण्याचं तुमचं स्वप्नं असेल तर इंडियन नेव्ही एक उत्तम पगाराची संधी घेऊन आली आहे. अविवाहित तरुणांकडून वेगवेगळ्या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नौसेनच्या जून 2020 च्या INET या प्रवेश परीक्षेसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेत उत्तीर्णा होणाऱ्या उमेदवारांची नेव्हल ओरिएंटेशन कोर्स (NOC) च्या रेग्युलर पायलट, पर्यवेक्षक, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, नेव्हल आर्ममेंट इन्स्पेक्शन कॅडर, लॉजिस्टिक, शिक्षा, इन्फोर्मेंच टेक्नॉलॉजी तसंच टेक्‍न‍ीकल इंजिनियर आणि इलेक्‍ट्र‍िकल इंजिनियर या पदांवर काम करण्याचा संधी मिळणार आहे.

पालक म्हणून तुम्ही आपल्या मुलांसोबत असं तर वागता नाही ना? करू नका 'या' चूका

अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 मे पासून सुरू झाली असून, त्यासाठी 29 मे पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. SSC (NAIC) अधिकाऱ्यांचा प्रोबेशन कालावधी हा तीन वर्षांचा राहणार आहे. तर इतर शाखा आणि कॅडरमधील अधिकाऱ्यांचा प्रोबेशन कालावधी दोन वर्षांचा राहणार आहे.

या कालावधीत कोणत्याही अधिकाऱ्याचं वर्तन असमाधानकारक राहिलं तर त्यांना वगळलं जाऊ शकतं. फक्त अविवाहित पुरुष उमेदवारच या जागांसाठी अर्ज करू शकतात हे उमेदवारांनी अर्ज भरताना लक्षात ठेवावं. तर प्रशिक्षणादरम्यान, जर उमेदवार विवाहित आढळल्यास, त्याला सेवेतून काढून टाकलं जाईल आणि सरकारद्वारे त्याच्यावर करण्यात आलेला संपूर्ण खर्च त्याला मिळालेला पगार आणि भत्त्यांसह परत करावा लागेल.

तुम्ही वाढलेलं पोट लपवण्याचा प्रयत्न करता का? 'या' चुका करू नका

निवड प्रक्रिया - 

1) INET

2) SSB द्वारे निवड

मेरिट ल‍स्‍टि -

1 - INET आणि SSB या दोन्हीच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होईल.

2 - SSB द्वारे निवडण्यात आलेले आणि वैद्यकीयदृष्ट्या फिट असलेल्या उमेदवारांची वेगवेगळ्या शाखा आणि कॅडर्समधील रिक्त असलेल्या जागांवर योग्यतेनुसार नियुक्ती केली जाईल.

पदाची नावे आणि पदसंख्या

1) SSC अर्मामेंट इन्स्‍पेक्‍शन कॅडर (NIAC) - 08 पदे

2) SSC ATC - 04 पदे

3) SSC पर्यवेक्षक - 06 पदे

4) SSC पायलट (MR) - 03 पदे

5) SSC (पायलट, यात MR समाविष्ट नाही) - 05 पदे

6) SSC लॉजिस्‍ट‍िक - 14 पदे

7) SSC XII - 15 पदे

आनंदी जीवनासाठी मनाची एकाग्रता आवश्यक, करा 'हे' उपाय

टेक्‍नीकल ब्रांच

1) SSC इंजिनिअरिंग ब्रान्च जनरल सर्व्हिस - 24 पदे

2) SSC इलेक्‍ट्र‍िकल ब्रांच जनरल सर्व्हिस - 18 पदे

शैक्ष‍ण‍िक ब्रांच

1) PC एजुकेशन - 18 पदे

पगार -

1) सब लेफ्ट‍नंट - Rs. 56,100/ ते Rs. 1,10,700/-

2) लेफ्ट‍नंट - Rs. 61,300/ ते Rs. 1,20,900/-

3) लेफ्ट‍नंट कमांडर - Rs. 69,400/ ते Rs. 1,36,900/-

4) कमांडर - Rs. 1,21,200/ ते Rs. 2,12,400/-

First published: May 19, 2019, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading