Home /News /lifestyle /

कशाला हवं Diet food; इंडियन फूड खाऊनच कमी होईल तुमचं वजन

कशाला हवं Diet food; इंडियन फूड खाऊनच कमी होईल तुमचं वजन

भारतीय खाद्यपदार्थ (Indian food) खाल्ल्यानं वजन वाढतं (weight gain) असा सर्वसामान्यपणे समज आहे.

    मुंबई, 24 नोव्हेंबर : वजन कमी (weight loss) करण्यामध्ये भारतीय अन्नपदार्थांना (indian food) जास्त प्राधान्य दिलं जात नाही. भारतीय पदार्थांमध्ये कार्ब आणि चरबीचं प्रमाण जास्त असल्यानं आहारात भारतीय पदार्थांचा समावेश करत नाहीत. आहार घेताना बहुतेक लोक ओट, योगर्ट सलाडसारखे पाश्चात्य पदार्थ पसंत करतात. पण खरंतर भारतीय पदार्थ पोषक असतात जे आपलं वजन कमी करण्यास आणि आपल्याला तंदुरुस्त, निरोगी ठेवण्यास मदत करतात. पण तुम्ही योग्य पद्धतीने ते तयार केले आणि त्यामध्ये योग्य घटकांचा वापर केला तर नक्कीच वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकता. 1) मसाले  - भारतीय जेवणात मोठ्या प्रमाणात मसाल्यांचा वापर केला जातो. यामध्ये हळद, लवंग, मिरपूड, जिरं आणि मोहरी यांसारख्या मसाल्यांचा वापर केला जातो. या मसाल्यांच्या वापरानं अन्नाला केवळ चवच येत नाही तर पोषक द्रव्यं मिळतात. यामध्ये मसाले केवळ पोषक द्रव्यंच देत नाही तर याचा औषध म्हणून देखील वापर केला जातो. या मसाल्यांमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरिअल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे घातक आजारांना प्रतिबंध करतात. हे आपल्याला बर्‍याच काळासाठी निरोगी ठेवण्यास आणि शरीरातील अशुद्धता काढून टाकून वजन कमी करण्याच्या प्रक्रियेस वेगवान करण्यास आणि शरीरातील पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात. हे वाचा - पेपर कपमध्ये चहा पिणं इकोफ्रेंडली असेलही, पण आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक 2) निरोगी फॅट - कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही योग्य प्रमाणात मसाल्यांचा वापर केल्यास तुम्हाला योग्य पद्धतीचे फॅट्स मिळतील. मोहरीचं तेल, नारळ तेल किंवा तूप योग्य प्रमाणात वापरा. तेलांचा जास्त वापर शरीराला हानी पोहोचवू शकतो आणि बर्‍याच आजारांना आमंत्रणदेखील देऊ शकतो. 3)पौष्टिक धान्य -  गव्हाबरोबरच बाजरी, नाचणी आणि ज्वारीसारख्या पदार्थांपासूनदेखील तुम्ही चपात्या तयार करू शकता.  संपूर्ण धान्य पीठापासून बनवलेल्या पोळीमध्ये प्रथिनं, फोलेट, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमसह पोषक तत्व असतात. 4)घरगुती खाद्यपदार्थ -भारतीय पदार्थ घरी ताजे बनवले असतात. त्यामुळे ते आरोग्याला अतिशय पोषक असतात. आपण निरोगी आणि पौष्टिक घटकांचा वापर करून पोळी किंवा भात तयार करू शकतो. हे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेस मदत करेल. प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा घरी शिजवलेले पदार्थ नेहमीच चांगले असतात. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास घरी तयार केलेले पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या. हे वाचा - Mediterranean आहार म्हणजे काय? या आहारामुळे मधुमेहाचा धोका कसा कमी होतो? 5) विविध पदार्थ - विविध प्रकारचे पदार्थ आणि जेवण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे एकाच प्रकारचे जेवण करण्याचा तुम्हाला कंटाळा येणार नाही. भारतामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असून पोहे, इडली, साबुदाणा खिचडी, उपमा आणि शिरा यांसारखे अनेक पदार्थ आहेत. या पदार्थांच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Food, Weight loss

    पुढील बातम्या