नवी दिल्ली, 18 डिसेंबर : पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात पोटाच्या कर्करोगाचं (Cancer) प्रमाण खूपच कमी आहे. याचं कारण भारतातील लोक अन्नात हळदीचा (Turmeric) वापर करतात, असं संशोधकांनी म्हटलं आहे. यामुळं कर्करोगाचा धोका कमी होतो. संशोधकांच्या मते, हळदीमध्ये असलेलं कर्क्यूमिन (Curcumin) कर्करोगाच्या पेशी (Cancer Cells) नष्ट करून ट्यूमरच्या वाढीस 80 टक्क्यांपर्यंत प्रतिबंधित करतं.
'झी न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, संशोधकांना असे आढळून आले की हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन एक सक्रिय घटक आहे ज्यामध्ये अनेक रोगांपासून मुक्त होण्याची क्षमता आहे. यूके कॅन्सर रिसर्चनुसार, हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास सक्षम आहे, अशी माहिती झी न्यूजनं दिली आहे.
हळदीमध्ये हा विशेष घटक काम करतो
NutritionFacts.org या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या एका लेखात अमेरिकन फिजिशियन मायकेल ग्रेगोर यांनी सांगितले की, पाश्चात्य देशांच्या तुलनेत आहारात हळदीचा सर्वाधिक वापर केला जातो अशा भागातील लोकांमध्ये पोटाच्या कर्करोगाचं प्रमाण खूपच कमी आहे. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात कर्करोगाचं प्रमाण खूपच कमी आहे. संशोधकांच्या मते, भारतीय पुरुषांपेक्षा अमेरिकन पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर (Prostate cancer) जास्त प्रमाणात आढळतो.
हे वाचा - चांदोबाच्या गावात चिमुकल्याचं नाव; 2 वर्षांचा मुलगा चंद्रावरील जमिनीचा झाला मालक
भारतीय आहारामुळे कमी होतो कर्करोगाचा धोका
डॉ. ग्रेगर म्हणाले, 'भारतीयांच्या खान-पानाच्या सवयी कर्करोगाचं प्रमाण कमी असण्यास कारणीभूत आहेत.' यामध्ये मांसाचा कमी वापर, मुख्यतः वनस्पतींवर आधारित आहार आणि मसाल्यांचं जास्त सेवन यांचा समावेश होतो. डॉ. मायकल ग्रेगर यांनी भारतीय आहाराविषयी सांगितलं की, 40 टक्के भारतीय शाकाहारी आहेत. मांसाहार करणारेदेखील मोठ्या प्रमाणात मांस खात नाहीत. भारतीय लोक भरपूर डाळी खातात आणि अनेक प्रकारचे मसाले खातात. या गोष्टी कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतात.
हे वाचा - Omicron ची तिसरी लाट आली तर दररोज 14 लाख रुग्ण सापडतील – तज्ज्ञांचा गंभीर इशारा
हळद अशा प्रकारे करते कार्य
डॉ. ग्रेगर म्हणाले की, भारतीय मसाल्याच्या हळदीमध्ये कर्क्युमिन हा असाच एक घटक आहे, ज्यावर सध्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी शास्त्रीय चाचण्या सुरू आहेत. संशोधनात असं दिसून आलंय की, हळदीमध्ये असलेलं कर्क्यूमिन तीन स्तरांवर कार्य करतं. कार्सिनोजेन्स आपल्या पेशींमध्ये पोहोचण्याआधीच ते आपलं कार्य सुरू करतं. यूके कॅन्सर रिसर्चतर्फे म्हटलंय की कर्क्यूमिनमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत. हे स्तनांचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग आणि त्वचेच्या कर्करोगाच्या पेशींवर परिणाम करू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips