नवी दिल्ली,28 मे : मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव जगभरात झपाट्याने वाढत आहे. 20 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतीय खासगी आरोग्य उपकरण कंपनी ट्रिविट्रान हेल्थकेअरने शुक्रवारी मंकीपॉक्स विषाणू शोधण्यासाठी रिअल-टाइम RT-PCR किट विकसित करण्याची घोषणा केली. माहिती देताना कंपनीने सांगितले की, ट्रिविट्रान हेल्थकेअरच्या संशोधन आणि विकास पथकाने मंकीपॉक्स विषाणू शोधण्यासाठी आरटी-पीसीआर आधारित किट विकसित केली आहे.
ट्रिविट्रान (Trivitron) चे मंकीपॉक्स रिअल-टाइम पीसीआर किट हे चार रंगांचे हायब्रिड किट आहे, जे एकाच नळीमध्ये कांजण्या आणि मंकीपॉक्समध्ये फरक स्पष्ट करू शकते. या चार-जीन RTPCR किटमध्ये, पहिला जनुक व्यापक ऑर्थोपॉक्स गटातील विषाणू शोधतो, दुसरा आणि तिसरा अनुक्रमे मंकीपॉक्स आणि स्मॉलपॉक्स विषाणू शोधतो आणि वेगळे करतो. चौथ्या जनुकाने मानवी पेशीशी साधर्म्य असलेले अंतर्गत संक्रमण ओळखले. कंपनीच्या म्हणण्यानुसार यासाठी 1 तास लागतो. कृपया लक्षात घ्या की हे किट केवळ संशोधन वापरासाठी उपलब्ध आहे.
मंकीपॉक्ससाठी भारत पूर्णपणे तयार -
दरम्यान, जगभरात मंकीपॉक्सची प्रकरणे समोर येत असताना, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, इतर देशांमध्ये वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत या आजाराचा सामना करण्यासाठी तयार आहे. मात्र, असे कोणतेही प्रकरण देशात अद्याप आढळून आलेलं नाही.
हे वाचा -
टक्कल पडलेल्यांसाठी आशेचा किरण! या औषधामुळे सहा महिन्यात पुन्हा उगवणार केस
कोरोना महामारीशी झुंज देत असलेल्या अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. ANI या वृत्तसंस्थेशी विशेष संवाद साधताना, ICMR शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा मुखर्जी यांनी सांगितले की, युरोप आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये हा आजार वेगाने पसरत असल्याने भारतही मंकीपॉक्स संसर्गावर लक्ष ठेवून सज्ज आहे.
हे वाचा -
फेस पॅक आणि फेशियल टोनर म्हणून समुद्री मिठाचा असा करा उपयोग, स्कीन होईल ग्लोइंग
आरोग्य तज्ज्ञांनी देशातील लोकांना कोणत्याही असामान्य लक्षणांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. विशेषत: मंकीपॉक्स-ग्रस्त देशांमध्ये प्रवास केलेल्या लोकांनी काळजी घ्यायला हवी. या आजाराच्या लक्षणांमध्ये जास्त ताप येणे, ग्रंथी सुजणे, अंगदुखी, अंगावर लाल पट्टे येणे इ. गोष्टी होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.