नाकावाटे दिली जाणारी मेड इन इंडिया लसही तयार; आता परवानगीची प्रतीक्षा

नाकावाटे दिली जाणारी मेड इन इंडिया लसही तयार; आता परवानगीची प्रतीक्षा

कोरोनाव्हायरसविरोधातील लढ्याच्या दिशेनं भारतानं आणखी एक पाऊल टाकलं आहे.

  • Share this:

चेन्नई, 19 जानेवारी : कोरोनाव्हायरसविरोधातील (coronavirus) लढ्यात भारतानं (india) आपली कंबर चांगलीच कसली आहे. भारताची आणखी एक स्वदेशी लस (made in india corona vaccine) तयार झाली आहे. आधी इंजेक्शन आणि आता नाकावाटेही दिली जाणारी लस (nasal corona vaccine) तयार करण्यात आली आहे. भारताला पहिली स्वदेशील लस देणाऱ्या भारत बायोटेक (bharat biotech) कंपनीनंच ही लस तयार केली आहे.

भारतात तयार करण्यात आलेल्या नझल वॅक्सिनचं लवकरच ट्रायल सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ट्रायलला परवानगी देण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबत सध्या चर्चा सुरू आहे आणि लवकरच ही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

भारत बायोटेकनच्या कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आलेली आहे. सध्या देशात कोरोना लशीकरण सुरू आहे. कोवॅक्सिन ही लस यूकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधातही प्रभावी असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

हे वाचा - कोविड-19 लशीसंबधित सर्व माहिती खुली करावी; वैद्यकीय तज्ज्ञांनी केली मागणी

दरम्यान याआधी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनंही (serum institute of india) अमेरिकेच्या कोडाजेन्सिक्स (Codagenix Inc.) या कंपनीसोबत नाकावाटे दिल्या जाणारी कोरोना लशीबाबत करार केला होता. या कंपनीनं तयार केलेली CDX-005 ही लस. या लशीत पुण्याच्या सीरम संस्थेची भागीदारी आहे. कोडाजेन्सिक्स कंपनीने याआधी दिलेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट या कोरोना लशीचं भारतात उत्पादन घेणार आहे.

हे वाचा - कोरोना टेस्ट तुमच्या हातात; Smartwatch देखील करू शकतं निदान

भारतात सध्या भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. सरकारनं यासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि आजारी असलेल्या व्यक्तींना लस दिली जात आहे. यासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. नोंदणीसाठी Cowin app उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

Published by: Priya Lad
First published: January 19, 2021, 2:32 PM IST

ताज्या बातम्या