Home /News /lifestyle /

खतरनाक Paanipuri! फक्त एक Golgappa खाऊन तरुणाची अवस्था भयंकर झाली

खतरनाक Paanipuri! फक्त एक Golgappa खाऊन तरुणाची अवस्था भयंकर झाली

देशातील ही सर्वात तिखट पाणीपुरी असल्याचं सांगितलं जातं आहे.

  भोपाळ, 27 नोव्हेंबर : पाणीपुरी (Paanipuri) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं  (Paanipuri video) . बहुतेकांना तर झणझणीत पाणीपुरी खायला आवडतं (Spicy Paanipuri video) . भैय्या तिखा दो, भैय्या और तिखा करो, असं कितीतरी तरुणी पाणीपुरीवाल्याला सांगताना तुम्ही पाहिलं असेल. कदाचित तुम्हीसुद्धा त्यापैकी एक असेल. अशी तिखट पाणीपुरी खाण्याची तुम्ही स्पर्धाही लावली असेल. पण देशातील सर्वात तिखट पाणीपुरी अशी आहे, जी एक खाल्ली तरी डोळ्यासमोर तारे दिसतील (India's most spicy paanipuri video). ही पाणीपुरी खाणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. देशातील सर्वात तिखट पाणीपुरीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत या पाणीपुरीचं पाणी नेमकं कसं बनवलं जातं ते दाखवण्यात आलं आहे आणि त्यानंतर एक तरुण ती पाणीपुरी खाताना दिसतो आहे. तरुण जशी ही पाणीपुरी खातो, जशी त्याची अवस्था अक्षरशः भयंकर झाल्याचं दिसतं. फक्त एक गोलगाप्पा खाताच तरुण खतम, बाय बाय असं म्हणतो.
  View this post on Instagram

  A post shared by Virat (@gareebpanda)

  gareebpanda नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही भारतातील सर्वात तिखट पाणीपुरी आहे. हे वाचा - 'मी काहीच चुकीचं केलं नाही'; Kanpur Gutkha Video मधला तो तरुण भडकला; पाहा VIDEO या व्हिडीओत दिसणारा तरुण जेव्हा ही पाणीपुरी खातो त्याच्या दुसऱ्याच क्षणी त्याचे डोळे बंद होता. नाकातोंडातून पाणी येतं. तो नाक-डोळे पुसताना दिसतो. ही पाणीपुरी इतकी तिखट आहे की खाताच त्याला समोर तारेच दिसू लागले. हा तरुण एकापेक्षा जास्त पाणीपुरी खाऊ शकला नाही. जर तुम्हाला स्पायसी खायला आवडत असेल तर ही पाणीपुरी ट्राय करा. असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आता तुम्ही तिखट खाण्याचे शौकिन असाल तर तुम्हाला ही पाणीपुरी खावीशी नक्कीच वाटेल. ही पाणीपुरी मिळते ते 'भगत जी के गोलगप्पे'वाल्याकडे. मध्य प्रदेशच्या ग्वालिअरमध्ये तुम्हाला ही पाणीपुरी खायला मिळेल. हे वाचा - तोंड उघडताच वाजायची शिट्टी; 12 वर्षीय मुलाचा मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक काय मग इतकी झणझणीत पाणीपुरी खाण्याची तुमची तयारी आहे का? आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Food, Viral, Viral videos

  पुढील बातम्या