Home /News /lifestyle /

पुण्यात तयार झाली Pfizer सारखीच कोरोना लस; लवकरच सुरू होणार ह्यमुन ट्रायल

पुण्यात तयार झाली Pfizer सारखीच कोरोना लस; लवकरच सुरू होणार ह्यमुन ट्रायल

देशातील पहिल्या mRNA कोरोना लशीच्या मानवी चाचणीला DCGI ने परवानगी दिली आहे.

    पुणे, 12 डिसेंबर : यूएसच्या फायझर (pfizer) कंपनीनं तयार केलेली कोरोना लस (corona vaccine) ही एमआरएनए (mRNA) वर आधारित आहे. अगदी याच पद्धतीनं पुण्यातही लस तयार करण्यात आली आहे. देशातील ही पहिली अशी लस आहे जी एमआरएनए (mRNA) तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आली आहे. या लशीच्या मानवी ट्रायललाही केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGI ने या लशीच्या मानवी चाचणीला परवानगी दिली आहे. पुण्यातील  Gennova Biopharmaceuticals या औषध कंपनीनं HGCO19  ही कोरोना लस तयार केली आहे. अमेरिकेच्या HDT बायोटेक कॉर्पोरेशनसह मिळून ही लस तयार करण्यात आली आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार देशातील ही पहिली अशी लस आहे जी  मॅसेंजर-RNA म्हणजे एमआरएनए (mRNA) पद्धतीचा वापर करून विकसित करण्यात आली आहे. यामध्ये पारंपारिक पद्धतीनं लशीची निर्मिती केली जात नाही. अशा लशी शरीरात कोणतं प्रोटिन तयार करायचं आहे, याच्या सूचना शरीराला देतात जेणेकरून आजाराविरोधात रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकेल.  ही लस पूर्णपणे सुरक्षित मानली जाते आणि त्याचे परिणामही चांगले येतात. पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार करम्यात आलेली असते. या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. हे वाचा - धक्कादायक! कोरोनाची लस घेतली आणि झालं HIV इन्फेक्शन? दरम्यान mRNA वर आधारित असलेली यूएसमधील फायझर कंपनीच्या लशीसाठीही भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागण्यात आली आहे. यासाठी कंपनीनं भारतात अर्ज केला आहे. याशिवाय ऑक्सफोर्ड आणि सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड आणि हैदराबादच्या भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीसाठीही आपात्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र सध्या या लशींचं तिसऱ्य़ा टप्प्यातील ट्रायल सुरू असून अद्याप या लशींना आपात्कालीन परवानगी देण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, अशी माहिती याआधी सूत्रांनी दिली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india

    पुढील बातम्या