Home /News /lifestyle /

कोरोनामुक्त रुग्णाला पुन्हा झाला Covid चा संसर्ग; आजार उलटण्याची देशातली पहिलीच केस मुंबईत

कोरोनामुक्त रुग्णाला पुन्हा झाला Covid चा संसर्ग; आजार उलटण्याची देशातली पहिलीच केस मुंबईत

देशात कोरोनामुक्त रुग्ण पुन्हा कोरोना संक्रमित (coronavirus reinfection) झाल्याने आता चिंता वाढली आहे.

मुंबई, 04 सप्टेंबर : एखाद्या व्यक्तीला एकदा कोरोनाव्हायरस (coronavirus reinfection) झाल्यानंतर त्याला पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते का? तर आता अशी काही प्रकरणं समोर येऊ लागली आहे. आधी हाँगकाँग आणि आता भारतातही असं प्रकरण दिसून आलं आहे. भारतातही एका व्यक्तीला दोन वेळा कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. देशातील हे पहिलं प्रकरण आहे. देशात Covid-19 चा संसर्ग पुन्हा होण्याचं पहिलं प्रकरण आढळलं आहे ते मुंबईत. मुंबईतील सायन रुग्णालयातील डॉक्टरला पुन्हा कोरोना झाला आहे. सायन रुग्णालयातील अनेस्थिशिया विभागातील ही महिला डॉक्टर आहे, जी दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित झाली आहे. सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुक्त झालेल्या या डॉक्टरमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं पुन्हा दिसून आली. चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली. त्यामुळे एकदा कोरोना झाला, शरीरात आता अँटिबॉडी आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीरात पुरेशा अँटिबॉडी नसतील तर कोरोनाची पुन्हा लागण होऊ शकते. हे वाचा - धक्कादायक! कोरोना रुग्णांची मृत्यूनंतरही अवहेलना, नातेवाईकच करत आहे 'हे' काम कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर त्याला प्रतिकार करणाऱ्या अँटिबॉडीज शरीरात तयार होतात.  शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्यास त्या व्यक्तीला कोरोनाची पुन्हा लागण होण्यापासून आणि ज्यांना कोरोना लस दिली जाईल त्यांना कोरोनाचं संक्रमण होण्यापासून संरक्षण देऊ शकतात. मात्र वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये या अँटिबॉडीज वेगवेळ्या कालावधीसाठी शरीरात राहत असल्याचं समोर आलं आहे. शरीरातील अँटिबॉडीज कमी होत असतील तर कायम स्वरूपात या आजाराला हरवणं अशक्य आहे.  रुग्णांना पुन्हा कोरोनाव्हायरसची लागण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. इंडियन मेडिकल काऊन्सिल रिसर्च (ICMR) ने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाविरोधातील इम्युनिटी पाच-सहा महिने ते काही वर्षांपर्यंत टिकून राहू शकतं, असं वेगवेगळ्या अभ्यासात दिसून आलं आहे. हे वाचा - सप्टेंबरच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रकोप, 24 तासांत 84 हजार नवीन रुग्णांची नोंद मुंबईतल्या जेजे रुग्णालयाने (JJ hospital) आयबीट्स फाऊंडेशनसह मिळून कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला. या अभ्यासात कोरोनाविरोधातील शरीरातील अँटिबॉडीज (corona antibody) 50 दिवसांतच कमी होत असल्याचं दिसून आलं. तर आइसलँडमधील बायोटेक कंपनी डिकोड जेनेटिक्सने केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाची लागण झाल्यानंतर तयार होणाऱ्या अँटिबॉडीज कमीत कमी चार महिन्यांपर्यंत इम्युनिटी देऊ शकतात.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या