मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Independence Day 2022 : यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

Independence Day 2022 : यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

Independence Day 2022 speech for children: यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

Independence Day 2022 speech for children: यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

Independence Day 2022 speech for children: दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय मुलांना स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण करण्यास सांगितलं जातं. साहजिकच तुम्हालाच त्यांच्या भाषणाची तयारी करून घ्यावी लागते.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 10 ऑगस्ट: स्वातंत्रदिन (Independence Day 2022) काही दिवसांवर आलाय. यंदाचा स्वातंत्र्यदिन कसा साजरा करायचा याचा विचार तुम्ही केला असेलच. परंतु दरवर्षीप्रमाणे तुम्हाला एका गोष्टीची तयारी करावी लागणार आहे. तुमच्या घरातील लहान मुलाला स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण लिहून देण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय मुलांना स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण करण्यास सांगितलं जातं. साहजिकच ही लहान मुलं भाषण कसं करायचं, हे विचारायसाठी तुमच्याकडे येतात. मग तुम्हालाच त्यांच्या भाषणाची तयारी करून घ्यावी लागते. तुम्ही त्यांची भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हवी. लहान मुलांकडून भाषणाची तयारी (Independence Day speech for children) करून घेताना पुढील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात.. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात करा ‘या’ मुद्द्यांचा समावेश -
  • 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं.
  • भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, देश
  • ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहे.
  • वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आपण लक्षात ठेवायला हवं.
  • 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना लागू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले.
हेही वाचा- Parenting Tips : अशा पद्धतीने मुलांना त्यांचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवा, मुलं होतील कॉन्फिडन्ट आणि मॅच्युअर
  • आपलं राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे.
  • भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोकस्तंभावरून घेतली गेली आहे.
  • राजमुद्रेखाली ‘सत्यमेव जयते’ हे  बोधवाक्य लिहिलं गेलं आहे, ज्याचा अर्थ ‘सत्याचाच विजय’ असा होतो.
  • आपल्या राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती, त्यांची जयंती आपण २ ऑगस्ट रोजी साजरी करतो.
स्वातंत्र्य दिनाचं भाषण लहान आणि सोपं ठेवा जेणेकरून मुलं गोंधळून जाणार नाहीत आणि त्यातील काही भाग विसरणार नाहीत किंवा मिसळणार नाहीत. वरील वाक्यांशिवाय तुम्ही आणखी माहिती शोधू शकता. एकदा का भाषण तयार झालं की त्याचा काहीवेळा सराव करून घ्या. असं केल्यानं मुलं दमदार भाषण करू शकतील.
First published:

Tags: Independence day, School children

पुढील बातम्या