वाढत्या वजनामुळे स्त्री 'या' आनंदापासून होते वंचित

वाढत्या वजनामुळे स्त्री 'या' आनंदापासून होते वंचित

जाडेपणा महिलांसाठी मोठी समस्या बनू शकते.

  • Share this:

मुंबई, 08 मार्च : जाडेपणा अनेक आजारांना आमंत्रण देतो. त्यामुळे हार्टअॅटॅक, डायबेटिस, आॅस्टियोआर्थरायटीससारखे रोग होत असतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की जाडेपणा महिलांसाठी मोठी समस्या बनू शकते.

जाडेपणा स्त्रियांना आई होण्यात अडथळा आणू शकतो. जाडेपणामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते. याचं काय कारण आहे?

एका संशोधनानुसार स्त्रीचं वजन वाढत गेलं की गर्भपात होण्याची शक्यता वाढते. गरोदरपणी शारीरिक आरोग्यावर बरेच परिणाम होत असतात. त्यात स्त्री जाडी असेल तर गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. सीडीसीच्या रिपोर्टनुसार स्त्री अगोदर जाडी होते. मग ती गरोदर झाली की तिचं वजन अजून वाढतं. आणि मग आधीच वजन जास्त असेल तर गुंतागुंत निर्माण व्हायला लागते.

त्यात अगोदर एकापेक्षा जास्त गर्भपात झाले असले तर पुन्हा गर्भपात होण्याची शक्यता वाढते. डायबेटिस, किडणीचा आजार, थायराॅइड गर्भपाताचं कारण होऊ शकतात.

याशिवाय आईचं वय आणि गर्भपात यांचा संबंध आहे. आईचं वय 30च्या पुढे असेल तर गर्भपाताची शक्यता वाढेल. महिलेच्या शरीरात हार्मोनची समस्या असेल तरीही गर्भपात होतो. विशेषत: प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनचं सिक्रिशन कमी झालं तर गर्भधारणा व्हायला  कठीण जातं. अजिबात ब्रेक न घेता एका जागी बसलं, तर महिलांमध्ये जाडेपणा वाढतो. कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढू शकतात. बराच वेळ बसल्यानं रक्तवाहिन्यांमधली एंझाइम चरबी बंद होते. त्यानं जाडेपणा आणि मोठ्या आतड्याचा कॅन्सर वाढतो.शेवटी हेल्थ इज वेल्थ. आरोग्य चांगलं असणं जास्त महत्त्वाचं. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं काही गोष्टींची काळजी घ्यायला हवीच. आरोग्य चांगलं राहिलं तर कामही छान होतंच.

VIDEO : अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे...कसं आहे नणंद-भावजयमधील बाँडिंग?

First published: March 8, 2019, 5:47 PM IST
Tags: women

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading