Home /News /lifestyle /

तुम्हाला नीट भूक लागत नाही? मग हे घरगुती उपाय ठरतील गुणकारी

तुम्हाला नीट भूक लागत नाही? मग हे घरगुती उपाय ठरतील गुणकारी

Home Remedies For Increase Appetite : धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याच्या विविध समस्या वाढत आहेत. अनेकांना भूक न लागण्याचा त्रास होतो, काहींना जेवण बघावेसेही वाटत नाही. अशा लोकांनी घरच्या घरी कोणते उपाय करावेत याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 डिसेंबर : भूक न लागणे किंवा काहीही खावेसे न वाटण्याचा त्रास अनेकांना होतो. काहींना तर जेवण बघूनही मळमळल्यासारखे होते. या कारणांमुळे काहीजण जेवायला बसल्यानंतर ताटात वाढलेले पूर्ण न खाताच उठतात. अशा समस्यांसाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो. ज्यामुळे अशा समस्या काही दिवसांमध्येच कमी झाल्याच्या तुम्हाला (Home Remedies For Increase Appetite) दिसून येईल. ग्रीन टी (Green tea) भूक न लागणे आणि अन्न न खाण्याच्या समस्येवर मात करण्यास ग्रीन टी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही रोज ग्रीन टी पिण्यास सुरू करा. यामुळे भूक न लागण्याची समस्या तर दूर होईलच, सोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढून आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे होतील. नॉर्मल दुधाचा चहा पिण्याऐवजी तुम्ही ग्रीन टीचा उपयोग करू शकता. लिंबू-पाणी भूक न लागण्याचा त्रास कमी करण्यासाठी लिंबू पाणी देखील उपयुक्त ठरू शकते. यासाठी रोज लिंबूपाणी पिण्यास सुरुवात करा. यामुळे तुम्हाला भूकही लागेल आणि जेवण पाहून तुम्हालाही ते खावेसे वाटेल. यासोबतच लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हे वाचा - लसूण कोरोनाच्या उपचारात प्रभावी आहे का? जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे ओवा ओवा खाल्ल्याने काही दिवसात तुमची भूक न लागण्याची समस्या दूर होईल. यासाठी तुम्ही रोज अर्धा चमचा ओवा काळ्या मीठासोबत खाऊ शकता. पोटात गॅस, अपचन यासारख्या समस्या असतील तर या समस्यांपासूनही यामुळे आराम मिळेल. हे वाचा - खूशखबर! शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र, सरकारी योजनांचा लाभ घेणं होणार सोपं त्रिफळा पावडर वापरा भूक न लागणे आणि अन्न खाण्याची इच्छा नसणे या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही त्रिफळा चूर्ण वापरू शकता. यासाठी तुम्ही दररोज एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत सेवन करू शकता. भूक लागण्यासोबतच इतर अनेक प्रकारच्या त्रासांपासून सुटका मिळेल. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या