Home /News /lifestyle /

पूर्ण-नीट झोप न घेणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा; नवीन संशोधनाचे भीतीदायक निष्कर्ष

पूर्ण-नीट झोप न घेणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा; नवीन संशोधनाचे भीतीदायक निष्कर्ष

Half-incomplete sleep has a bad effect on memory : आठ तासांपेक्षा कमी झोप आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. अन्न नीट पचवण्याची क्षमता, विषाणू संसर्गाशी लढण्याची क्षमता आणि अनेक शारीरिक प्रक्रियांवर त्याचा परिणाम होतो.

    नवी दिल्ली, 07 जानेवारी : अधिक काम करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी बहुतेक लोक झोपेशी तडजोड करतात. मात्र, याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हिंदुस्थान वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ऑस्ट्रेलियात झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. कमी तास झोपल्याने स्मरणशक्ती तसेच चयापचय आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाचे (University of South Australia) प्रोफेसर सिओभान बँक्स (Professor Siobhan Banks) सांगतात की, गेल्या पंधरा वर्षांतील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दीर्घकाळ झोप न घेतल्याने लठ्ठपणा, टाइप-2 मधुमेह (Type -2 Diabetes) आणि अगदी कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो. आठ तासांपेक्षा कमी झोप आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. अन्न नीट पचवण्याची क्षमता, विषाणू संसर्गाशी लढण्याची क्षमता आणि अनेक शारीरिक प्रक्रियांवर त्याचा परिणाम होतो. जे लोक बऱ्याच वर्षांपासून कमी झोप घेतात, त्यांना लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे (Half-incomplete sleep has a bad effect on memory) कर्करोग होण्याचा धोका वाढतो. कमी झोपेमुळे स्मरणशक्ती कमी (memory loss) होणे, एखादी गोष्ट समजण्यास उशीर होणे आणि थकवा यासारखे त्रास होण्याचीही (short term losses) शक्यता असते. एका रात्रीचीही झोप नीट न झाल्यास बहुतेक लोकांना या सर्व समस्या जाणवतात. पूर्ण झोप नाही झाली तर प्रोफेसर सिओभान बँक्स म्हणतात की, जर कामांच्या घाईत एक सरळ 8 तासांची झोप घेणे शक्य नसेल, तर तुम्ही मध्ये-मध्ये झोपून झोपेचा कालावधी पूर्ण करू शकता. तुम्हाला तुमची संपूर्ण झोप एकाच वेळी घेण्याची गरज आहेच असे नाही. काही जण रात्री 4-5 तासांची मुख्य झोप सतत घेऊ शकतात आणि नंतर ते त्यांची उरलेली झोप दुपारी एक किंवा दोन तास डुलकी घेऊन पूर्ण करू शकतात. हे वाचा - पुणे: 80 व्या वर्षी वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवलं, मुलाने कांदा कापण्याच्या सुरीनं चिरला बापाचा गळा झोपेचे तीन टप्पे आपल्या मेंदूला दररोज रात्री किमान एक दीर्घ झोपेचे चक्र आवश्यक असते, जेणेकरून शरीराची सर्व कार्ये ठीक राहतील. याचे कारण असे की आपल्या रात्रीच्या झोपेची मूलभूत 'एनाटॉमी' असते, ज्यामध्ये दोन मुख्य घटक असतात- जलद डोळ्यांची हालचाल, किंवा REM झोप आणि नॉन-REM झोप. नॉन-आरईएम झोप तीन टप्प्यांत येते. हे वाचा - Vastu Tips: भाग्य चमकण्यात तुमच्या चप्पलचाही असतो महत्त्वाचा रोल; जाणून घ्या त्यामागचं सूत्र पहिला टप्पा म्हणजे जेव्हा तुम्ही झोपेचा अनुभव घेत असाल. हा टप्पा काही मिनिटांचा असतो. दुसरा टप्पा म्हणजे हलकी झोप, ज्यामध्ये तुमच्या शरीराचे तापमान कमी होते आणि डोळ्यांच्या हालचाली थांबतात. हा टप्पा 10-25 मिनिटांचा असतो, परंतु तुम्ही जितका जास्त झोपतो तितका जास्त वेळ जातो. तिसरा टप्पा स्लो-वेव्ह स्लीप आहे, जो मुख्यतः रात्रीच्या पहिल्या भागात होतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या