नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : खाण्याच्या सवयींचा मानवी आरोग्यावर परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. तुम्हाला माहीत आहे का की, काही आरोग्यदायी गोष्टी एकत्र खाणं (food combinations) आपल्या हेल्थसाठी खूप धोकादायक आहे. काही पदार्थ एकत्र खाल्ल्यानेही तुम्ही आजारी पडू शकता. आयुर्वेदिक फिजिशियन डॉ. दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये शरीरासाठी हानिकारक फूड कॉम्बिशनची (food combinations) माहिती दिली आहे.
दूध आणि मासे -
दूध आणि मासे हा पूर्णपणे भिन्न आहार आहे, त्यामुळे ते एकत्र खाणं टाळलं पाहिजे. दूध थंड असते, तर माशाची चव गरम असते. या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्यानं आपले रक्त आणि शरीराचे कार्य बिघडू शकते. लोकांनी दूध आणि मीठ यांचे मिश्रणही टाळावे, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
View this post on Instagram
दूध आणि फळे -
केळीचा शेक लोकांमध्ये खूप सामान्य आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की फळांसोबत दुधाचे मिश्रण आपल्या आरोग्याला हानी पोहोचवते. केळी हे दूध, दही किंवा ताकासोबत कधीही खाऊ नये, असे तज्ज्ञ सांगतात. दूध आणि केळीच्या या मिश्रणामुळे सर्दी, खोकला किंवा अॅलर्जी होऊ शकते.
हे वाचा - Mumbai Blast, अंडरवर्ल्ड आणि हसीना पारकर; देवेंद्र फडणवीसांनी फोडला ‘नवा’बॉम्ब
तूप आणि मध समान प्रमाणात नको -
तूप आणि मध समान प्रमाणात कधीही सेवन करू नये. यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. मध नैसर्गिकरित्या गरम आणि कोरडा आहे, तर तूप त्याच्या थंड आणि मॉइश्चरायझिंग गुणवत्तेसाठी ओळखले जाते. जर तुम्ही तूप आणि मध मिसळून खात असाल तर यापैकी एकाचे प्रमाण जास्त ठेवा.
हे वाचा - डेटिंग अॅपवर स्वतःचं प्रोफाइल पाहून चकित झाली लारा दत्ता; VIDEO शेअर करत दिली प्रतिक्रिया
दही किंवा पनीर-
हिवाळ्यात दही, चीज किंवा यॉगर्ट यांसारख्या गोष्टी खाणे खूप फायदेशीर मानले जाते. पण रात्रीच्या वेळी अशा गोष्टी खाणे टाळावे. दही इन्फ्लेमेशन आणि रक्त, पित्त, कफ यांच्याशी संबंधित समस्या निर्माण करू शकते. ज्या लोकांची पचनक्रिया खराब असते, त्यांना पनीरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे मध कधीही गरम करून खाऊ नये. हे आपल्या पचनसंस्थेला आधार देणारे एंजाइम मारून टाकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health Tips