मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

प्रेग्नन्सीनंतर आहारात 8 पदार्थांचा आवर्जून समावेश; आईसह बाळही राहिल हेल्दी

प्रेग्नन्सीनंतर आहारात 8 पदार्थांचा आवर्जून समावेश; आईसह बाळही राहिल हेल्दी

प्रेग्ननन्सी आणि प्रेग्नन्सीनंतरदेखील काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा असतो.

प्रेग्ननन्सी आणि प्रेग्नन्सीनंतरदेखील काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा असतो.

प्रेग्ननन्सी आणि प्रेग्नन्सीनंतरदेखील काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा असतो.

  • myupchar
  • Last Updated :

आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण. पण या सुखाबरोबर अनेक आव्हानंदेखील समोर येतात. ज्याप्रमाणे गरोदरपणात विशेष काळजी घेतली जाते त्याचप्रकारे बाळंतपणानंतरही काळजी घेणं गरजेचं असतं आणि त्यात महत्त्वाचा असतो तो आहार. myupchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं, स्तनपान देणाऱ्या मातांसाठी बाळाला योग्य वाढ आणि विकासासाठी आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची पोषक तत्त्वे देणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

ओटमिल

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, ओटमिलमध्ये कर्बोदकं आणि प्रथिनं असतात. ओटमिलमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर असतात. यामुळे पोट भरतं आणि मन समाधानी राहतं. स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी ओट्स दूध वाढवण्यासही मदत करतात. प्रसूतीनंतर बद्धकोष्ठता असलेल्या मातांसाठीही हे अतिशय उपयुक्त आहे. यात जास्त लोह असल्याने अशक्तपणाही जाणवत नाही.

अंडं

दररोज एक ते दोन अंडी खा. उकडून, शिजवून, ऑमलेट बनवून तुम्हाला जसं हवं तसं खा. यामुे आई आणि मुल दोघांची हाडे मजबूत होतात.

सुकामेवा

काजू, बदाम आणि अक्रोड या ड्रायफ्रुटमध्ये पौष्टिक घटक असतात. सुकामेवा प्रथिनं, लोह, कॅल्शियम, जस्त आणि जीवनसत्त्व के, बी आणि ईने समृद्ध आहे.यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. सुकामेवा नैसर्गिकरित्या लॅक्टोजेनिक असतो याचा अर्थ ते दुधाच्या उत्पादनास प्रोत्साहित करतात.

हिरव्या पालेभाज्या

ब्रोकोली, पालकसारख्या पालेभाज्या सर्वात उत्तम. त्यात कॅल्शियम आणि लोह असतं जे फक्त आईसाठीच नाही आईचं दूध वाढवण्यासही मदत करतं. या भाज्या जीवनसत्त्वं आणि खनिजं यांनी देखील समृद्ध असतात.

फळ

फळ गोड असतं, ज्यामध्ये नैसर्गिक शर्करा असते. सफरचंद आणि केळीसारखी फळं आतड्यांसंबंधी हालचाल आणि पचन नियंत्रित करतात संत्री आणि किवीसारख्या इतर फळांमध्ये जीवनसत्त्व सी असतं. यामुळे दूध निर्मितीस मदत होते. फळं मायक्रोन्युट्रिएंट्सने भरलेली असतात ज्यामुळे आईचं शरीर मजबूत होतं.

मेथी

मेथी बद्धकोष्ठता, पोट फुलणं यासारख्या पचन समस्या कमी करण्यास मदत करतं. त्यात फायटोएस्ट्रॅगेनल्स आहेत जे स्तनात दुधाची निर्मिती वाढवतात. एक चमचा मेथी दाणे एक कप पाण्यात रात्रभर भिजवा आणि दुसर्‍या दिवशी सकाळी हे पाणी उकळवून गाळून प्या.

दूध

दूधही स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त आहे. यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून राहण्यास मदत होते.

रावस मासा

रावस माशामध्ये प्रथिनं आणि जीवनसत्त्व बी 12 जास्त असतं. त्यात उच्च चरबी असते जी नवजात मुलाच्या मज्जासंस्थेच्या विकासास मदत करते. आठवड्यातून दोनदा त्याचा आहारात समावेश करावा.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख सकस आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

First published:

Tags: Health, Lifestyle, Pregnancy, Woman