Home /News /lifestyle /

Eyes Health Care Tips: डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश; दिसतील आश्चर्यकारक परिणाम

Eyes Health Care Tips: डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश; दिसतील आश्चर्यकारक परिणाम

Eyes Health Care Tips: डोळे (Eyes Health Care) हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं त्यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आहारात पोषक तत्त्वांनी युक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.

    नवी दिल्ली, 18 डिसेंबर : आजच्या जीवनशैलीत कोणत्याही वयाच्या व्यक्तीच्या किंवा लहान मुलाच्या डोळ्यांवर चष्मा दिसणं ही बाब कॉमन झाली आहे. मग ती संगणकावर काम करणारी व्यक्ती असो, वा मोबाईलवर गेम खेळणारी मुलं. इतकंच नाही तर, कधी कधी दोन-तीन वर्षांच्या बाळाचे डोळ्यांवरही चष्मा दिसतो. याचं कारण म्हणजे गरोदरपणी आणि गरोदरपणापूर्वी महिलांना पुरेशी पोषक तत्त्वं (Eyes Health Care Tips) मिळत नाहीत. डोळे (Eyes Health Care) हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं त्यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आहारात पोषक तत्त्वांनी युक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. जाणून घेऊया, डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आहारात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश केला जाऊ शकतो. गाजर खा दृष्टी सुधारण्यासाठी रोजच्या आहारात गाजर समाविष्ट केलं जाऊ शकतं. गाजरात व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात आढळतं, जे दृष्टी सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हिवाळ्याच्या दिवसांत गाजरं बाजारात सहज उपलब्ध होतात. सुका मेवा खा (Dry fruits) सुका मेवा देखील दृष्टी वाढवण्यासाठी खूप मदत करतो. यामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात आढळतं, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळं तुम्ही रोजच्या आहारात सुक्या फळांचा समावेश करू शकता. हे वाचा - Healthy Breakfast: सकाळी नाश्त्यामध्ये या गोष्टी खाणं आहे फायदेशीर; अनेक आजार राहतील दूर आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा दृष्टी सुधारण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खूप फायदेशीर आहेत. तुम्ही हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. हिरव्या भाज्या अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात. त्यांच्यामुळं शरीराला अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यात हिरव्या भाज्या बाजारात सहज उपलब्ध होतात. त्यामुळं यांचं सेवन जरूर करावं हे वाचा - Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी चुकूनही या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका, या आजारांचा धोका आहारात अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी व्हिटॅमिन 'ए' फायदेशीर असतं. हे अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये असतं. दृष्टी चांगली होण्यासाठी या पदार्थांचं सेवन करणं खूप फायदेशीर मानलं जातं. याशिवाय, दूध आणि अंड्यांमध्ये उच्च प्रथिनांसह इतरही अनेक पोषक तत्त्वं आढळतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या