मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी या पदार्थांचा करा आहारात समावेश, मानसिक आरोग्यही सुधारेल

डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी या पदार्थांचा करा आहारात समावेश, मानसिक आरोग्यही सुधारेल

पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही चिंता किंवा नैराश्याने झगडत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात थोडा बदल करण्याची आवश्यकता आहे.

पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही चिंता किंवा नैराश्याने झगडत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात थोडा बदल करण्याची आवश्यकता आहे.

पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही चिंता किंवा नैराश्याने झगडत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात थोडा बदल करण्याची आवश्यकता आहे.

  मुंबई, 7 ऑगस्ट : डिप्रेशनच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. जंक फूड आणि अस्वास्थ्यकर पदार्थ खाल्ल्याने डिप्रेशनची समस्या वाढू शकते. जास्त प्रमाणात कॅफीन, प्रक्रिया केलेले अन्न आणि शुद्ध साखर यासारख्या पदार्थांचे सेवन केल्याने मानसिक आरोग्यास समस्या निर्माण होऊ शकतात. नैराश्याने ग्रासलेल्या लोकांना हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला तज्ञ नेहमीच देतात. चांगले खाल्ल्याने तुम्ही नैराश्याचे परिणाम काही प्रमाणात कमी करू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे खाल्याने तुम्ही डिप्रेशनपासून दूर रहाल आणि मानसिक स्‍वास्‍थ्‍य मजबूत होईल. भरपूर फळे आणि भाज्या खा हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खाल्ल्याने आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन हार्मोन सिक्रीट होते. ज्यामुळे मूड सुधारतो. भाज्या आणि फळे कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असतात. हे नैराश्याशी लढण्यास मदत करते आणि मानसिक आरोग्य सुधारते. फळांमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते.

  Health Tips : पनीर आणि अंडी एकत्र खावे का? वजन कमी करणाऱ्यांना हे माहित असावंच

  मासे ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आपल्या मेंदूचे कार्य सुधारतात. हे माशांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. मासे खाल्ल्याने डिप्रेशनची लक्षणे कमी होऊ शकतात. ओमेगा-३ नट, फ्लेक्ससीड ऑइल, हिरव्या पालेभाज्यांमध्येही आढळते. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही या गोष्टींचे सेवन करू शकता. दुधामुळे सुधारते मानसिक आरोग्य आतापर्यंत अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नैराश्याचा धोका वाढतो. सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी देखील मिळू शकते. पण तुम्हाला ते खाल्ल्यानेच भरपूर प्रमाणात मिळेल. दूध आणि टोफूमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल. Food For Memory : स्मरणशक्ती वाढवतील हे पदार्थ, माईंड सुपरफास्ट होण्यासाठी असा असावा आहार व्होल ग्रेन्स सेलेनियम असलेल्या पदार्थांचे सेवन मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. व्होल ग्रेन्स म्हणजेच संपूर्ण धान्य, शेंगा, सीफूड, मांस यामध्ये सेलेनियमचे प्रमाण लक्षणीय असते. या गोष्टींचे सेवन केल्याने तुम्हाला नैराश्यापासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. या गोष्टींचा आहारात नियमित समावेश केल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Lifestyle, Mental health

  पुढील बातम्या