मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जवळ आलीय मुलांची बोर्डाची परीक्षा, अ‍ॅक्टिव माइंडसाठी आहारात सामील करा हे पदार्थ

जवळ आलीय मुलांची बोर्डाची परीक्षा, अ‍ॅक्टिव माइंडसाठी आहारात सामील करा हे पदार्थ

दहावी आणि बारावीच्या मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा आता सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत इतर गोष्टींसोबतच त्यांच्या आहाराचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

दहावी आणि बारावीच्या मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा आता सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत इतर गोष्टींसोबतच त्यांच्या आहाराचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

दहावी आणि बारावीच्या मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा आता सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत इतर गोष्टींसोबतच त्यांच्या आहाराचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 फेब्रुवारी : मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा आता लवकरच सुरु होणार आहेत. अशा स्थितीत मुलांवर जे टेन्शन असते, ते त्यांच्या पालकांना मुलांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. मुलांची परीक्षा चांगली जावी आणि त्यांना चांगले मार्क मिळावेत यासाठी ते काहीही करायला तयार असतात. अशा परिस्थितीत मुलांच्या आहाराचीही काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे मन परीक्षेपूर्वी आणि दरम्यान सक्रिय राहते.

चांगल्या आहारामुळे मुलं सर्व काही चांगल्या प्रकारे समजू शकतात. यासोबतच त्याचे आरोग्यही चांगले असावे. यासाठी काही खास गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा. चला त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया, मुलांच्या आहारात त्यांचा समावेश करून तुम्ही त्यांना परीक्षेत चांगले काम करण्यास मदत करू शकते.

Health Tips : मुलांना माती खाण्याची सवय लागलीय? हे घरगुती उपाय करतील मदत

निरोगी नाश्त्याने दिवसाची सुरुवात करा

मुलांच्या दिवसाची सुरुवात सकस नाश्त्याने करा. पुरी, परांठा, तळलेले पदार्थ खाण्याऐवजी दूध, अंडी, ओट्स, म्यूसली, उपमा, फळे, पोहे, इडली, ज्यूस, मोड आलेले कडधान्य यासारख्या गोष्टी खायला द्या. यामुळे ग्लायसेमिकचे प्रमाण कमी होईल आणि शरीराला पुरेसे ग्लुकोज मिळत राहील. तसेच बदाम, अक्रोड, मनुका, द्राक्षे, संत्री, अंजीर, सोयाबीन आणि सफरचंद खायला द्या. यामुळे मुलांची स्मरणशक्ती सुधारेल.

नाश्ता आणि दुपारच्या जेवणादरम्यान या गोष्टी खायला द्या

मुलांना पुन्हा पुन्हा भूक लागते. अशा परिस्थितीत चिप्स, बर्गर, केक, पिझ्झा यासारख्या गोष्टींऐवजी त्यांना हलका आणि सकस आहार द्या. यासाठी तुम्ही त्यांना ड्रायफ्रुट्स, स्मूदीज, ज्यूस, सूप, फळे, डार्क चॉकलेट यासारख्या गोष्टी खायला देऊ शकता. यामुळे ते सक्रिय राहतील आणि त्यांचे मनही अभ्यासात गुंतले जाईल.

दुपारच्या जेवणात मुलांना द्या हे पदार्थ

दुपारच्या जेवणात पुरी आणि परांठा ऐवजी साधे दही किंवा रायता रोटी, डाळ, भात, कोशिंबीर सोबत द्या. गाजर, बीटरूट, भोपळा, हिरव्या पालेभाज्या आणि मासे यांचे सेवन केल्याने मेंदूही तीक्ष्ण होतो. पालक, ब्रोकोली पण खायला द्या. त्यामध्ये ल्युटीन, फोलेट, बीटा कॅरोटीन आणि जीवनसत्त्वे असतात, जे मेंदूला निरोगी आणि तीक्ष्ण बनवतात.

या गोष्टी संध्याकाळी मुलांना द्या

दुपारच्या जेवणानंतर मुलांना संध्याकाळपर्यंत थोडी भूक लागते. अशा परिस्थितीत मुलांना चहा, कॉफी, पकोडे आणि काही तेल-मसाले देण्याऐवजी भोपळ्याच्या बिया, अक्रोड, फळांचे रस, गोड लस्सी, खारट लस्सी, सूप, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, रास्पबेरी आणि ओट्स यांसारखे पदार्थ दिले जाऊ शकतात.

पिंपळाच्या पानांचे आरोग्य फायदे माहितीये? पोटापासून त्वचेच्या समस्यांसाठी असा करा वापर

रात्रीच्या जेवणात मुलांना द्या हे पदार्थ

रात्रीच्या जेवणात मुलांना अशा गोष्टी द्या, ज्यामध्ये चांगले पोषक तत्व असतात. घरी शिजवलेले अन्नच द्यावे. राजमा तांदूळ, चणे, डाळी, खिचडी, रोटी, भाज्या सोबत सोया पदार्थ मुलांना द्या. हलक्या फॅटी गोष्टीही दिल्या जाऊ शकतात, त्यामुळे चांगली झोप येईल.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle