मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair Care Tips : निरोगी केसांसाठी आवश्यक असतात हे जीवनसत्व, आतापासूनच करा आहारात समावेश

Hair Care Tips : निरोगी केसांसाठी आवश्यक असतात हे जीवनसत्व, आतापासूनच करा आहारात समावेश

ज्याप्रमाणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार आवश्यक असतो, त्याचप्रमाणे केसांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात.

ज्याप्रमाणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार आवश्यक असतो, त्याचप्रमाणे केसांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात.

ज्याप्रमाणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार आवश्यक असतो, त्याचप्रमाणे केसांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात.

  मुंबई, 17 ऑगस्ट : केस हे व्यक्तिमत्व वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. केस पाहून व्यक्तीचे वयच नाही तर त्याच्या आरोग्याचाही अंदाज लावता येतो. ज्याप्रमाणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार आवश्यक असतो. त्याचप्रमाणे केस निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात. केस मजबूत आणि निरोगी बनवण्यात व्हिटॅमिन-ए महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन ए प्रमाणेच व्हिटॅमिन बी आणि सीदेखील केसांच्या वाढीसाठी आवश्यक मानले जातात. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे केस गळणे, तुटणे आणि कमकुवत होण्याची समस्या उद्भवते. चला जाणून घेऊया कोणते जीवनसत्त्व केस मजबूत करतात. व्हिटॅमिन ए केस मजबूत आणि आकर्षक बनवण्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्त्वाची भूमिका बजावतात. हेल्थलाइननुसार केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित आहे. माणूस जे खातो त्याचा थेट परिणाम केसांवर होतो. केसांना निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिनचे सेवन खूप महत्वाचे आहे. ज्यामध्ये अ जीवनसत्वाचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन-ए टाळूवर सेबम तयार करण्याचे काम करते, जे केसांना आर्द्रता देऊन पोषण देते. रताळी, गाजर, भोपळा, पालक, अंडी आणि दही यामध्ये व्हिटॅमिन-ए मोठ्या प्रमाणात असते.

  Mushroom Veg Or Non-Veg : मशरूम व्हेज आहे की नॉनव्हेज? हे आहेत मशरूम खाण्याचे फायदे आणि तोटे

  व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन-बी विशेषतः बायोटिन केसांसाठी खूप महत्वाचे आहे. नट्समध्ये भरपूर व्हिटॅमिन-बी असते. अंडी, सॅल्मन, अव्होकाडो, बिया, पालक आणि बदाम प्रामुख्याने व्हिटॅमिन-बीसाठी खाऊ शकतात. तसेच व्हिटॅमिन-बी ची कमतरता दुग्धजन्य पदार्थातूनही भरून काढता येते. Avoid food in dinner: रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खायचे टाळा; लाँग लाईफ निरोगी राहू शकाल व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी ला जीवनरक्षक म्हणूनदेखील ओळखले जाते. व्हिटॅमिन सी केवळ केसांसाठीच नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. व्हिटॅमिन सी साठी स्ट्रॉबेरी, लिंबू, संत्री आणि मोसंबी यांसारखी लिंबूवर्गीय फळे खावीत. शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास सप्लिमेंट्सदेखील घेता येतात.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Woman hair

  पुढील बातम्या