• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • 'या' देशात तासाला मिळतो सर्वांत जास्त मोबादला, तर इतर देशात किती?; दिवसभरात कमावा 55 हजार रुपये

'या' देशात तासाला मिळतो सर्वांत जास्त मोबादला, तर इतर देशात किती?; दिवसभरात कमावा 55 हजार रुपये

ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (Organization for economic co-operation and development) या संस्थेच्या अहवालातून अनेक देशांमध्ये मिळणाऱ्या ताशी मानधनाबद्दलची माहिती प्रसिद्ध केली जाते.

  • Share this:
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: कामाचा ताशी मोबदला (Salary per hour) किती द्यायचा हे प्रत्येक देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीच्या (Gross Domestic Product- GDP) आधारे ठरवलं जातं. साहजिकच अमेरिका, इंग्लंडसारख्या विकसित देशांमध्ये ताशी मोबदला सर्वाधिक असेल, असं वाटलं असेल. प्रत्यक्षात मात्र तसं नाही. ताशी मानधनाचा विचार करायचा झाला, तर अमेरिका, इंग्लंडपेक्षाही जास्त मानधन दिलं जाणारे देश आहेत. तसंच, काही देशांमध्ये ताशी मिळणारं मानधन एवढं आहे, की अन्य काही देशांतले नागरिक तेवढे पैसे महिन्याभरातही कमावू शकत नाहीत. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (Organization for economic co-operation and development) या संस्थेच्या अहवालातून अनेक देशांमध्ये मिळणाऱ्या ताशी मानधनाबद्दलची माहिती प्रसिद्ध केली जाते. त्यापैकी निवडक माहिती आपण जाणून घेऊ या. जगात सर्वाधिक ताशी मानधन आयर्लंडमधल्या (Ireland) नागरिकांना मिळतं. तिथलं ताशी मानधन जवळपास सात हजार रुपये आहे. तिथली लोकसंख्या 65.72 लाखांपेक्षा जास्त असून, त्या देशाचा जीडीपी 33,373 कोटी आहे. हेही वाचा-  गर्भपात रोखण्यासाठी घेणारं औषध बाळावर करतो दुष्परिणाम, वाढतो कॅन्सरचा धोका
 नॉर्वेमध्ये (Norway) एक तास काम करून सर्वसामान्य नागरिक 5680 रुपये कमावू शकतो. हादेखील एक छोटासा देश आहे. तिथली लोकसंख्या 53 लाखांपेक्षा जास्त असून, जीडीपी 39,883 कोटी एवढा आहे.
या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक ताशी मानधनाच्या बाबतीत अमेरिकेचा (USA) तिसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत एक तास काम करून व्यक्ती 5075 रुपये मिळवू शकते. अमेरिकेचा जीडीपी 19.39 लाख कोटी रुपये एवढा आहे. या यादीत जर्मनी (Germany) हा देश चौथ्या क्रमांकावर आहे. जर्मनीत सर्वसामान्य व्यक्ती एक तास काम करून 4958 रुपये मिळवू शकते. जर्मनीचा जीडीपी 3.68 लाख कोटी रुपये आहे. हेही वाचा-  आहारातील स्निग्धांशाचं प्रमाण नव्हे तर त्यांचा सोर्स असतो महत्त्वाचा; नव्या संशोधनातील महत्त्वाची माहिती
 या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे (France) फ्रान्स. फ्रान्सची लोकसंख्या सुमारे 6.71 कोटी असून, जीडीपी 2.58 लाख कोटी रुपये एवढा आहे. तिथे एक तास काम केल्यास व्यक्तीला 4864 रुपये मिळू शकतात.
प्रति तास सर्वाधिक मानधनाच्या यादीत ऑस्ट्रेलिया (Australia) सहाव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2.46 कोटी एवढी आहे. तिथे तासभर काम केल्यास 4098 रुपये मिळू शकतात. इटलीत (Italy) तासभराच्या कामासाठी 3967 रुपये मिळू शकतात. या बाबतीत हा देश सातव्या क्रमांकावर आहे. इटलीची लोकसंख्या 6.06 कोटी असून, जीडीपी 1.93 लाख कोटी रुपये एवढा आहे. या बाबतीत युरोपीय महासंघातले (European Union) देश आठव्या क्रमांकावर आहेत. या महासंघात अनेक देशांचा समावेश आहे. तिथे एक तास काम करून व्यक्तीला 3984 रुपये मिळू शकतात. हेही वाचा-  साखर नव्हे दुधात गूळ घालून प्यायलात तर होईल जास्त फायदा; निरोगी आरोग्यासाठी गुणकारी
 स्पेनमध्ये (Spain) एक व्यक्ती तासभर काम करून 3806 रुपये कमावू शकते. तिथला जीडीपी 1.31 लाख कोटी रुपये असून, लोकसंख्या 4.66 कोटी एवढी आहे.
या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे (Canada) कॅनडा. तिथे प्रति तास 3762 रुपये कमाई होऊ शकते. त्या देशाची लोकसंख्या 3.67 कोटी असून, जीडीपी 1.65 लाख कोटी रुपये आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या संस्थेने त्या त्या देशाची लोकसंख्या, त्या देशाचा जीडीपी आदी बाबींचा विचार करून ही यादी तयार केली आहे. संबंधित देशांच्या सुबत्तेचा अंदाज त्यावरून येतो.
Published by:Pooja Vichare
First published: