मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कृष्णाच्या नगरीत लागलं गाय आणि बैलाचं लग्न, वाजत-गाजत निघालं वऱ्हाड

कृष्णाच्या नगरीत लागलं गाय आणि बैलाचं लग्न, वाजत-गाजत निघालं वऱ्हाड

भारतासारख्या देशात कधी काय घडेल सांगता येत नाही. गावच्या महिलांनी गायीचं कन्यादान केलं. बँडबाजाच नाही तर अगदी हुंडा, आंतरपाट, वरात या सगळ्या गोष्टींचाही लग्नात समावेश होता. या अनोख्या लग्नाची चर्चा पंचक्रोशीमध्ये रंगली आहे.

  • Published by:  News18 Desk

मथुरा, 4 फेब्रुवारी : मथुरा (Mathura) म्हणजे कृष्णाची नगरी. या शहराचं धार्मिक (religious) आणि सांस्कृतिक महत्त्व मोठंच आहे. या शहरात एका अजब लग्नाची (marriage) घटना घडली आहे.

हे लग्न लागलं ते चक्क एका बैल (bull) आणि गाईमध्ये (cow). बैल आणि गाय दोघांनाही खूप छान सजवलं गेलं. लग्नात सहभागी लोकांनी एखाद्या एरवीच्या लग्नासारखेच सगळे रितीरिवाज यथासांग पार पाडले. डोक्यावर मुंडावळ्या बांधून वासरू निघालं तेव्हा मागे सगळी वरात निघाली. बँडबाजाच्या तालावर लोक मनसोक्त नाचत होते. या अनोख्या लग्नाचा अनुभव घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्दी करून उभे होते.

अलीगढ जिल्ह्यातील किला बेसवा गांव इथल्या उदयभान सिंह यांच्या नेतृत्वात ही वरात कस्बा राया इथं पोचली. बच्चू सिंह फौजी यांनी वरातीचं स्वागत केलं. त्यांच्या घराच्या आसपासही हे लग्न पाहायला खूप गर्दी जमली होती. बच्चू सिंह यांच्या घरात मंडप टाकला गेला. गाय आणि बैलाचं लग्न अगदी सगळे रितीरिवाज (traditions) पाळून धुमधडाक्यात संपन्न झालं.

गावच्या महिलांनी गायीचं कन्यादान केलं. बच्चू सिंह म्हणाले, की गायीमध्ये ३३ कोटी देवदेवता राहतात. आपण काही सगळ्यांची वेगवेगळी पूजा करू शकत नाही. मग आम्ही विचार केला, की नंदी बाबा आणि नंदी मैयाचं लग्न करूया. यातून नक्कीच पुण्य मिळेल.

बँडबाजाच नाही तर अगदी हुंडा, वराती या सगळ्या गोष्टींचाही लग्नात समावेश होता. या अनोख्या लग्नाची चर्चा पंचक्रोशीमध्ये रंगली आहे.

First published:

Tags: Marriage, Uttar pradesh