मुंबई, 02 नोव्हेंबर : सुक्या मेवामध्ये (ड्रायफ्रुट्स) बदाम हे सर्वांनाच आवडतात. कारण ते केवळ चवीला चांगले असण्यासह पौष्टिकही असतात. हल्ली दिवाळीला लोक घरी आलेल्या पाहुण्यांना बदाम (almonds) भेटवस्तू म्हणून देतात. त्यामुळं या सणाला बदामाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. ही संधी पाहून नफेखोर भेसळयुक्त बदाम (adulterated almonds) बाजारात उतरवतात.
भेसळयुक्त बदामांमुळं तुमची लूट होण्यासह, आरोग्यही बिघडू शकतं. म्हणून, तुम्ही बदाम खरेदी कराल तेव्हा प्रथम ही साधी चाचणी घ्या.
बनावट बदाम चाचणी: भेसळ केलेले बदाम कसे ओळखावे?
बदाम पासून तेल काढा
बदामात एक नैसर्गिक तेल असते, ज्यामध्ये भरपूर पोषण असते. हे तेल बदामातून काढल्यानंतर त्याचं पोषणमूल्य खूपच कमी होतं. बदामापासून तेल काढणं इतक सोपं नसलं तरी हे काम सहजपणे करणारी मशिन्स बाजारात उपलब्ध आहेत. ते ओळखण्यासाठी, कागदावर काही बदाम दाबून पहा. जर त्यात पुरेसं तेल असेल, तर त्याच्या खुणा कागदावर उमटतील.
हे वाचा - T20 World Cup मध्ये खराब कामगिरी, भारताच्या दिग्गजांचा पत्ता कट, न्यूझीलंडविरुद्ध या खेळाडूंना संधी!
बदाम वर पॉलिश
बदाम सुकल्यावर त्याचा रंग गडद होत जातो. म्हणूनच ते ताजे दिसण्यासाठी त्यावर हलक्या रंगाचं पॉलिश केलं जातं. पण असा भेसळ केलेला बदाम तुम्ही सहज ओळखू शकता. यासाठी थोडे बदाम घेऊन तळहाताच्या मध्यभागी चोळा. बदामाला पॉलिश केलं तर तळहातावर रंग सुटतो. यासोबतच बदामाचं पॅकिंग पारदर्शक पॅकेटमध्ये केलं असेल तर, त्याच्या आत लाल रंगाचे कण दिसू शकतात.
हे वाचा - Samsung चा सर्वात स्वस्त 5G Smartphone; 48MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स
बदाम मध्ये जर्दाळूच्या आतील बिया
काही लोक बदामामध्ये जर्दाळूच्या आतील बिया घालतात, ज्या बदामासारख्या दिसतात. पण त्यांचा आकार लहान असतो आणि रंग बदामापेक्षा हलका असतो. त्यामुळेच तुम्ही भेसळयुक्त बदाम बघून सहज ओळखू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips