कुत्र्यांना फिरवायला गेलेल्या व्यक्तीवर कोसळली वीज, पाहा हा धक्कादायक VIRAL VIDEO

कुत्र्यांना फिरवायला गेलेल्या व्यक्तीवर कोसळली वीज, पाहा हा धक्कादायक VIRAL VIDEO

वीज त्याच्या बुटांवर पडली. पण याचा झटका एवढा मोठा होता की त्याचक्षणी त्याची शुद्ध हरपली. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. एक व्यक्ती त्याच्या पाळीव कुत्र्यांना घेऊन बाहेर फिरायला पडला असताना अचानक त्याच्यावर वीज पडली. वेळेतच त्याला लोकांनी रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला.

एलेक्स कोरीस नावाच्या व्यक्तीसोबत 3 ऑक्टोबरला टेक्सास येथील स्टुब्नर एअरलाइन पशुचिकित्सक रुग्णालयाजवळ ही घटना घडली. वीज त्याच्या बुटांवर पडली. पण याचा झटका एवढा मोठा होता की त्याचक्षणी त्याची शुद्ध हरपली. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये वीज पडतानाचा क्षण स्पष्टपणे दिसत आहे. यात एलेक्स रस्त्यावरून चालत असताना त्याच्या सोबत त्याचे काही पाळीव कुत्रे आहेत. वीज पडताचक्षणी कुत्रे घाबरून पळून जातात आणि एलेक्स एखाद्या ठोकळ्या प्रमाणे जमिनीवर कोसळतो. यानंतर लगेच काही लोक त्याच्या मदतीला धावत त्याला सीपीआर देतात आणि त्याला रुग्णालयात भरती करतात.

ABC News ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कोरीस अजूनही रुग्णालयात असून त्याच्या प्रकृतीत सुधार होत आहे. या घटनेच्या काही वेळानंतर त्याच्या पाळीव कुत्र्यांनाही शोधण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 11:24 AM IST

ताज्या बातम्या