Home /News /lifestyle /

पालकांनो लक्ष द्या! अपुरी झोप तुमच्या किशोरवयीन मुलांना देतेय डिप्रेशन

पालकांनो लक्ष द्या! अपुरी झोप तुमच्या किशोरवयीन मुलांना देतेय डिप्रेशन

कमी वयात झोप न लागणं हे नैराश्याचे कारण ठरू शकतं. संशोधकांना असं आढळलं आहे.

  • myupchar
  • Last Updated :
    निरोगी राहण्यासाठी चांगली झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला बराच काळ व्यवस्थित पूर्ण झोप येत नसेल तर अस्वस्थता, थकवा, दिवसा झोप येणं तसंच अचानक जास्त वजन कमी होणं किंवा वाढणं अशा समस्या उद्भवू शकतात. एवढंच नाही तर झोपेचा अभाव मेंदूवर देखील परिणाम करतो. कमी वयात झोप न लागणं हे नैराश्याचे कारण ठरू शकतं. संशोधकांना असं आढळलं आहे की, पौगंडावस्थेतील मुलं ज्यांना अपूर्ण झोप लागते, त्यांच्या पुढील आयुष्यात मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. चाइल्ड सायकोलॉजी या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात झोपेची गुणवत्ता आणि पौगंडावस्थेतील मुलांच्या झोपेचे प्रमाण यांचं विश्लेषण केलं गेलं आणि असं आढळलं की, खराब झोप आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांचा एकमेकांशी महत्त्वपूर्ण संबंध आहे. या अभ्यासामध्ये 4790 जण सहभागी झाले होते. ज्यांना डिप्रेशन होतं त्यांच्यात झोपेची गुणवत्ता आणि झोपेचं प्रमाण कमी होतं. तसंच चिंताग्रस्तांमध्ये केवळ योग्य झोपेची कमतरता आढळली. हा निष्कर्ष चिंता किंवा नैराश्याची नोंद नसलेल्या आणि पौगंडावस्थांतील तरुणांची तुलना करून काढण्यात आला. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. केएम नाधीर म्हणतात की, झोपेची कमतरता मेंदूच्या भावना, विचार आणि विचारांना संतुलित ठेवण्याच्या क्षमतेत बाधा आणतं आणि विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्येची शक्यता वाढवतं. हे वाचा - वेदना आणि सूज; तुम्हाला माहिती नसलेली Diabetes ची 4 लक्षणं यूकेमधील रिडिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितलं की, किशोरवयीन मुलांसाठी झोप आणि मानसिक आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण संबंध आहे, हे दर्शवण्यासाठी हे नवीन संशोधन एक चांगला पुरावा आहे. या अभ्यासानुसार असं म्हटलं आहे की ज्या तरुणांना औदासिन्यानं आणि चिंतेनं ग्रासलेले असतं त्यांच्या किशोरावस्थेमध्ये त्यांना अपूर्ण  झोप मिळाली होती. असंही लक्षात आले की ज्यांनी औदासिन्याचा अनुभव घेतला आहे त्यांच्यातील झोपेच्या सरासरी प्रमाणात फरक आढळतो, ते इतर सहभागींच्या तुलनेत दर रात्री 30 मिनिटांनी झोपायला जातात. संशोधनात असं स्पष्ट करण्यात आलं आहे की किशोवयीन मुलांच्या आरोग्यासाठी चांगल्या झोपेकडे अजिबात दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. अभ्यासानुसार, संशोधकांना असं आढळले की ज्या मुलांना झोपेचा त्रास होत नाही त्यांना दररोज किमान आठ तास झोप लागते आणि आठवड्याच्या शेवटी ते साडेनऊ तासांपेक्षा अधिक झोपतात. तसंच औदासिन्य असलेल्या गटातील तरुणांना दररोज साडेसात तासांपेक्षा कमी वेळ झोप मिळत होती आणि आठवड्याच्या शेवटी ते फक्त नऊ तासांची झोप काढत होते. हे वाचा - ब्रेस्टफिंडिंग करणाऱ्या मातांसाठी; दूध येत नसेल तर बाळाच्या आईने खावेत 10 पदार्थ नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, 14-17 वर्षे वयोगटातील मुलांना दररोज रात्री साधारणतः 8-10 तास झोपेची आवश्यकता असते. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. नबी वाली म्हणतात की झोपेच्या चांगल्या सवयीमुळे, झोपेच्या समस्या दूर होऊ शकतात आणि शांत झोप येण्यास मदत होऊ शकते. किशोरवयीन मुलांनी आपली रोजची झोपेची आणि जागे होण्याची वेळ समान ठेवली तर आणखी चांगले होईल. दिवसभर सक्रिय रहा जेणेकरून आपल्याला रात्री चांगली झोप मिळेल. झोपी जाण्या आधी मोठ्या प्रमाणात अन्न ग्रहण करू नका आणि शीतपेये टाळा. झोपण्या आधी मोबाईल, लॅपटॉपवर वेळ घालवू नका, झोपायला त्रास होण्याचे हे एक मोठे कारण आहे. त्याऐवजी झोपेच्या आधी अंघोळ करणे, पुस्तके वाचणे किंवा मंद आवाजात संगीत ऐकणे यासारख्या चांगल्या सवयींचा अवलंब करा. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - झोपेचा विकार: लक्षणे, कारणे... न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Health, Sleep

    पुढील बातम्या