1 जानेवारीपासून 2021 पासून या तुमच्या आयुष्यातल्या या 10 गोष्टी बदलणार

1 जानेवारीपासून 2021 पासून या तुमच्या आयुष्यातल्या या 10 गोष्टी बदलणार

नवं वर्ष बऱ्याच बदललेल्या नव्या गोष्टी घेऊन येत असतं. अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नव्या वर्षात दाखल होण्याआधी समजून घेतल्याच पाहिजेत...

  • Share this:

मुंबई, 31 डिसेंबर : नवीन वर्षात अर्थात 1 जानेवारी 2021 पासून काही नियमात (rules) बदल होत आहे. यामध्ये पॉझिटिव्ह पे सिस्टम, संपूर्ण देशात चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग (FasTag) अनिवार्य, छोट्या व्यावसायिकांसाठी GST फायलिंगमध्ये (GST Filing) बदल यांसारख्या नियमांचा समावेश आहे. हे सगळे बदल तुमच्या माझ्या जगण्याशी थेट संबंधित आहेत. त्यामुळे नव्या वर्षात हे महत्त्वाचे बदल (changes) लागू होण्याआधी  जाणून घ्या त्याबाबत विस्तारानं

जिओ कॉलिंग होणार विनामूल्य!

रिलायन्स Jio ने (Reliance Jio) 1 जानेवारीपासून पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विमामूल्य (free calling) केली आहे. ज्या ग्राहकांनी जिओचं सब्स्क्रिप्शन घेतलं आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. जिओने IUC पूर्णपणे बंद केला असून आता 1 जानेवारीपासून विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे.

IUC म्हणजे interconnect usage charges म्हणजेच जिओ ते इतर नेटवर्कमध्ये कॉल करण्यासाठी आकारण्यात आलेले पैसे होय. आधी जिओ यासाठी 14 पैसे आकारत होता तर नंतर 7 पैसे आकारले जात होते. आता हा चार्ज हटवण्यात आला असून विनाशुल्क कॉलिंग 1 जानेवारीपासून करता येणार आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी ही मोठी बातमी दिली आहे.

विमाखरेदी होणार सोप्पी

नवीन वर्षात टर्म लाइफ इन्शूरन्स पॉलिसी (life insurance policy) खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे. विमा नियामक संस्था IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना 1 जानेवारीपासून 'सरल जीवन विमा पॉलिसी' सुरू करण्यास सांगितले आहे. त्याअंतर्गत, नवीन वर्षापासून ग्राहकांना कमी प्रीमियमवर मुदत योजना खरेदी करण्याची संधी मिळेल. ही एक स्टँडर्ड टर्म इन्शूरन्स पॉलिसी असेल. यामुळे ग्राहकांना कंपन्यांकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेण्यात मदत होईल.

सर्व चारचाकी वाहनांसाठी FasTag अनिवार्य

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Union Ministry of Road Transport and Highways) 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली आहे. 1 डिसेंबर 2017 पूर्वी विकण्यात आलेल्या फोर-व्हील किंवा एम अँड एन श्रेणी वाहनांसाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य असेल. त्यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 (Central Motor Vehicles Rules, 1989) मध्ये बदल करण्यात आले आहेत.

चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिममध्ये बदल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India -RBI) 1 जानेवारी 2021 पासून चेकच्या माध्यमातून पॉझिटिव्ह पे सिस्टिम (Positive Pay system) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI ने हा निर्णय चेक पेमेंटमधील फ्रॉड रोखण्यासाठी घेतला आहे. हा नवीन नियम लागू झाल्यानंतर 50,000 आणि त्यापेक्षा अधिक रक्कम चेकच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी पॉझिटिव्ह पे प्रणाली लागू होईल. यामध्ये चेक जारी करणाऱ्याच्या माहितीची दुसऱ्यांदा पुष्टी केली जाईल. चेक देणाऱ्याला चेक नंबर, चेक डेट, कुणाला पेमेंट केलं आहे त्याचा खाते क्रमांक, रक्कम इ. माहिती द्यावी लागेल.

कॉन्टॅक्टलेस कार्ड्स वापरून होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची मर्यादा वाढवली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India -RBI) कॉन्टॅक्टलेस कार्ड्स वापरून होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची मर्यादा (Contactless card transaction limit) वाढवली आहे. ही मर्यादा 2,000 रुपयांवरून वाढवून ​​5,000 करण्यात आली आहे. हा नियम 1 जानेवारी 2021 पासून लागू केला जाणार आहे.

तिमाही आधारावर GST रिटर्न फाइल करण्याची सुविधा

1 जानेवारी 2021 पासून जवळापास 94 लाख छोट्आ व्यापाऱ्यांना (small businesses) तिमाही GST रिटर्न फाइल करण्याची सुविधा मिळेल. अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यावसायिंकाचा टर्नओव्हर 5 कोची रुपयांपर्यंत आहे, त्यांना दर महिन्याला रिटर्न फाइल करण्याची आवश्यकता नाही. वर्षातून 4 वेळा त्यांना GST रिटर्न फाइल करावा लागेल.

लँडलाइन वरुन मोबाइलवर कॉल करण्याआधी जोडावा लागेल शून्य

डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन्स (Department of Telecommunications - DoT) ने लँडलाइन वरुन मोबाइलवर कॉल करण्याआधी 0 (शून्य) जोडणे अनिवार्य केलं आहे. हा नियम 15 जानेवारी 2021 पासून लागू होईल. यासाठी टेलिकॉम डिपार्टमेंटने नवीन व्यवस्था लागू करण्यासाठी 1 जानेवारीपर्यंत सर्व कामं पूर्ण करण्यास सांगितले आहे.

निवडक फोन्समध्ये बंद होईल WhatsApp

1 जानेवारीपासून काही प्लॅटफॉर्मसवर WhatsApp सपोर्ट करणं बंद होणार आहे. WhatsApp पेज ने अशी माहिती दिली आहे की, व्हॉट्सॲपने (Whatsapp) जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोन्स आणि आयओएसचा सपोर्ट बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केलं आहे. यामुळे जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयओएस फोन्समध्ये आता व्हॉट्सॲप (Whatsapp) सुविधा मिळणार नसल्याचं निश्चित झालं आहे. आता ios 9 आणि अँड्रॉइड 4.0.3 या ऑपरेटिंग सिस्टीम (Operating System) पासून सुरू होणाऱ्या OS वरच  व्हॉट्सॲप (Whatsapp) चालू शकणार आहे.

नवीन वर्षापासून वाढतील कार्सच्या किंमती

वाहन उत्पादक 2021 मध्ये नवीन किंमतीसह सुरुवात करण्याची तयारी करत आहेत. भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी पुढील महिन्यापासून त्याच्या मॉडेल्सच्या किंमतीत वाढ करण्यास सुरवात करेल. मॉडेल्सप्रमाणे ही किंमत बदलेल. एमजी मोटरने जाहीर केले आहे की ते पुढील वर्षी भारतात किंमती वाढवणार आहेत. कंपनीचे म्हणणं आहे की, इनपुट खर्च वाढल्यामुळे किंमती 3% वाढतील. त्याचबरोबर रेनॉल्ट इंडियानेही पुढील वर्षी या कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

दुचाकी वाहनांची दरवाढ

दुचाकी वाहन कंपनी (two wheeler company) हीरो मोटोकॉर्पने जाहीर केले आहे की वाढत्या इनपुट खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी ते 1 जानेवारी 2021 पासून आपल्या वाहनांच्या किंमती 1,500 रुपयांपर्यंत वाढवतील.

हे सगळे बदल नीट समजून घेत सज्ज व्हा नव्या वर्षाच्या स्वागताला!

Published by: News18 Desk
First published: December 31, 2020, 6:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading