मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Vitamin E : केस आणि त्वचेच्या सौंदर्यवृद्धीसाठी ई जीवनसत्त्वाचे महत्त्व

Vitamin E : केस आणि त्वचेच्या सौंदर्यवृद्धीसाठी ई जीवनसत्त्वाचे महत्त्व

कोरोना महामारीमुळे रोगप्रतिकारक शक्तीचं महत्त्व साऱ्या जगाला पटलं आहे. ई जीवनसत्त्व त्याच्या वृद्धीसाठी उपयुक्त असतं.  केस आणि त्वचेच्या सौंदर्यवृद्धीसाठी ई जीवनसत्त्वाचे महत्त्व काय आहे जाणून घ्या.

कोरोना महामारीमुळे रोगप्रतिकारक शक्तीचं महत्त्व साऱ्या जगाला पटलं आहे. ई जीवनसत्त्व त्याच्या वृद्धीसाठी उपयुक्त असतं. केस आणि त्वचेच्या सौंदर्यवृद्धीसाठी ई जीवनसत्त्वाचे महत्त्व काय आहे जाणून घ्या.

कोरोना महामारीमुळे रोगप्रतिकारक शक्तीचं महत्त्व साऱ्या जगाला पटलं आहे. ई जीवनसत्त्व त्याच्या वृद्धीसाठी उपयुक्त असतं. केस आणि त्वचेच्या सौंदर्यवृद्धीसाठी ई जीवनसत्त्वाचे महत्त्व काय आहे जाणून घ्या.

मुंबई, 19 ऑगस्ट:  शरीराला आवश्यक असणाऱ्या अनेक जीवनसत्त्वांपैकी एक म्हणजे ई जीवनसत्त्व. अक्रोड, बदाम, ब्रोकोली अशा काही पदार्थांमधून ते विपुल प्रमाणात मिळतं. त्वचा आणि केसांच्या संवर्धनासाठी ते महत्त्वाचं असतं. तसंच शरीराला अँटिऑक्सिडंट्सचा पुरवठा करण्याचं काम हे जीवनसत्त्व करतं. त्यामुळे शरीराला ई जीवनसत्त्वं पुरेशा प्रमाणात मिळालं पाहिजे. त्या व्यतिरिक्तही ई जीवनसत्त्व शरीरासाठी कसं उपयोगी असतं याबाबत इंडिया डॉट कॉमनं सविस्तर वृत्त दिलं आहे. ई जीवनसत्त्वामुळे शरीरातील पेशींचं संरक्षण होतं. अर्थात, याचा परिणाम म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती  वाढते. कोरोना महामारीमुळे रोगप्रतिकारक शक्तीचं महत्त्व साऱ्या जगाला पटलं आहे. ई जीवनसत्त्व त्याच्या वृद्धीसाठी उपयुक्त असतं. चरबीमध्ये विरघळणारं असं हे जीवनसत्त्व असतं. शरीरासाठी अँटिऑक्सिडंट म्हणून ते काम करतं. ई जीवनसत्त्व असलेली उत्पादनं यूव्ही किरणांपासून व धुळीपासून संरक्षण मिळवण्यासाठी उपयोगी पडतात. तसंच त्वचेचं तारुण्य टिकवण्यासाठीही त्यांचा फायदा होतो. केअरिंग कंपाउंड्सच्या संस्थापिका शुभिता अगरवाल यांनी ई जीवनसत्त्वाचे फायदे व शरीरासाठी त्याचं महत्त्व सांगितलं आहे. हेही वाचा - तिबेटीयन उपचारानुसार किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल 'या' काळ्या पदार्थांंचं सेवन केसांसाठी ई जीवनसत्त्व केसांच्या खालच्या त्वचेमध्ये रक्तप्रवाह वाढवण्याचं व रक्ताभिसरण वाढवण्याचं काम ई जीवनसत्त्व करतं. यामुळे केस गळणं कमी होतं, तसंच केस चांगले होतात. केसांसाठी ई जीवनसत्त्वाचे उपयोग लक्षात घेऊन अनेक उत्पादनांमध्ये आता ई जीवनसत्त्वाचं प्रमाण वाढवलं आहे. ई जीवनसत्त्वामुळे केस वाढतात, फ्रिझीनेस कमी होतो तसंच खराब झालेले केस चांगले होतात. केसांना चमक येते. त्वचेसाठी फायदेशीर त्वचेवरील जळजळ व सूर्यकिरणांमुळे होणारी त्वचेची हानी रोखण्यासाठी ई जीवनसत्त्व खूप फायदेशीर ठरतं. यात जखम भरून येण्यासाठी महत्त्वाचे गुणधर्म असतात. ई जीवनसत्त्वामुळे कोलॅजिन तयार होण्यासाठी मदत होते व त्यामुळे नितळ, व उजळ त्वचा मिळते. ई जीवनसत्त्व असलेली उत्पादनं वापरल्यानं त्वचेचा पोत  सुधारतो व सुरकुत्या कमी होतात. ई जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर विपरित परिणाम होतो. हृदयाशी संबंधीत अनेक आजारांचा धोका या जीवनसत्त्वामुळे कमी होतो. तसंच हार्ट स्ट्रोक, हॅमरेजची शक्यता कमी होते. कर्करोगामध्ये जेव्हा शरीराची रोगप्रतिकार शक्ती स्वतःहून काम करत नाही, त्यावेळीही याचा फायदा होतो. मोतिबिंदूसाठीही याचा उपयोग होतो. ई जीवनसत्त्वामुळे मोतिबिंदूची वाढ रोखली जाते. लहान मुलं व तरुणांसाठी ई जीवनसत्त्व खूप उपयुक्त असतं. त्वचा आणि केसांसाठी याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये याचा वापर केलेला असतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी व तारुण्य टिकवण्यासाठी ई जीवनसत्त्वाचा आहारात भरपूर समावेश केला पाहिजे.
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या