दिल्ली, 8 सप्टेंबर : आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांना आणि उत्सवांना
(Festivals & Celebrations) विशेष महत्व आहे. घराघरात गणपती विराजमान झाले आहेत. गणेशांच्या आगमानानंतर दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमीचा उपवास असतो. महिलांसाठी हा उपवास अतिशय महत्त्वाचा असतो. भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषिपंचमी म्हणतात. याच दिवशी ऋषिंविषयी कृतज्ज्ञता व्यक्त केली जाते.
खरंतर हिंदू संस्कृतीत पाप पुण्य याला एक वेगळे महत्त्व आहे. त्यामुळेच या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते आणि कळत नकळत घडलेल्या पापांपासून मुक्तता व्हावी यासाठी ऋषिंना मनोभवे वंदन केलं जातं.
या वर्षी ऋषिपंचमी 11 सप्टेंबरला असणार आहे. सकाळी 11.22 मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त असणार आहे.
ऋषिपंचमीचं महत्त्व
या दिवशी सात ऋषिंची पूजा केली जाते. ऋषिपंचमीचं व्रत सौभाग्यवती महिलांनी करायचं असतं. पुराणांनुसार स्त्रीयांनी उपवास करुन हे व्रत केल्यास त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. संपूर्ण घराला सुखशांती मिळते. अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी हे व्रत करतात. ज्या ऋषिंनी आपल्या तपोबलाने जगावर उपकार केले. त्या ऋषींचं स्मरण या दिवशी केलं जातं. या व्रताने मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने कमी होतो असं म्हणतात.
(
OMG! गेल्या 48 वर्षांत एकदाही झोपले नाही मोहनलाल; तरीही प्रकृती आहे ठणठणीत)
ऋषिपंचमीची पूजा कशी करावी
या दिवशी स्त्रीयांनी पहाटे उठून सुर्योदयाआधी स्नान करावं. स्नान केल्यानंतर सप्तर्षीं म्हणजे अरुंधतीसह कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ यांची पूजा केली जाते. या व्रतासाठी देव्हाऱ्यात सप्तऋषींची प्रतिमा तयार करावी. त्यावर कलश ठेवावा. तूपचा दिवा लावावा.
(
Ganesh Chaturthi 2021: गणपतीची तयारी करण्याअगोदर हे नियम वाचा)
आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी व्रत करत असल्याचा संकल्प करावा. ऋषींना फळांचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर ऋषींचं नदीमध्ये विसर्जन करावं. या दिवशी स्त्रियांनी धान्य खायचं नसतं.
काही ठिकाणी बैलाचे पाय न लागलेल्या तांदूळाची भाकरी आणि शेताच्या बांधावर मिळणारी भाजी केली जाते. यासाठी तेल, मिरची ही वेगळ्या पद्धतीने उगवलेली असते. हल्ली बाजारातही ग्रामीण महिला हे साहित्य घेऊन विकायला येतात.
(
आजही पृथ्वीवर आहे कृष्णाचं हृदय; हैराण करणारं हे रहस्य माहिती आहे का?)
ग्रामीण भागात महिला रात्री 12 नंतर उपवास सोडतात. या दिवशी महिला एकत्र येऊन जाग्रणही करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.