मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मोठ्यांची की लहान मुलांची, कोणाची प्रतिकारशक्ती असते अधिक मजबूत? संशोधकांनी दिली माहिती

मोठ्यांची की लहान मुलांची, कोणाची प्रतिकारशक्ती असते अधिक मजबूत? संशोधकांनी दिली माहिती

Immunity of Infants is Stronger: एका नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती बहुतेक लोकांना वाटते त्यापेक्षा खूप मजबूत असते आणि ते नवीन रोगजंतुशी लढू शकतात (अनेक रोगांना कारणीभूत असलेले विषाणू आणि बॅक्टेरिया). प्रौढांच्या तुलनेत त्यांची प्रतिकारशक्ती चांगली (Immunity of Infants is Stronger) असते.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : आपल्यापैकी बहुतेक पालकांना असे वाटते की, मुलांची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) कमकुवत असते, त्यामुळे त्यांना संसर्गापासून अधिक संरक्षित करणे आवश्यक आहे. परंतु, एका नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती बहुतेक लोकांना वाटते त्यापेक्षा खूप मजबूत असते आणि ते नवीन रोगजंतुशी लढू शकतात (अनेक रोगांना कारणीभूत असलेले विषाणू आणि बॅक्टेरिया). प्रौढांच्या तुलनेत त्यांची प्रतिकारशक्ती चांगली (Immunity of Infants is Stronger) असते. यूएसमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या इरविंग मेडिकल सेंटरमधील शास्त्रज्ञांनी (Irving Medical Center of Columbia University) केलेल्या अभ्यासात हे देखील दिसून आले की, लहान मुलांवर COVID-19 चा परिणाम कमी प्रमाणात दिसून आला. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या मायक्रोबायोलॉजी आणि इम्युनोलॉजी विभागातील प्राध्यापक डोना फारबर म्हणाल्या की, "लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती प्रौढांच्या तुलनेत कमकुवत आणि अविकसित असते, असे म्हटले जाते." पण ते खरे नाही.'

नवीन अभ्यासात, डोना फारबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रोगप्रतिकारक प्रणालीच्या नवीन रोगजंतुंच्या प्रतिसादाचे आणि ते नष्ट करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन केले. इन्फ्लूएंझा आणि रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरसमुळे लहान मुलांमध्ये प्रौढांच्या तुलनेत अनेक श्वसनाचे आजार होतात, मुख्यत: ते या विषाणूंच्या संपर्कात पहिल्यांदाच येतात.

हे वाचा - रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या नावाखाली बनावट इंजेक्शनची विक्री; जळगावात मोठी कारवाई

संशोधन कसे झाले?

यादरम्यान, संशोधकांनी अशा टी-पेशी गोळा केल्या, ज्यांची रोगजनकांशी कधीही रिअ‌ॅक्शन झालेली नव्हती. या टी-पेशींना विषाणू-संक्रमित उंदरांमध्ये इंजेक्शन देण्यात आले. यातून असे दिसून आले की, लहान मुलांमधील टी-पेशी विषाणू पूर्ण नष्ट करण्यात प्रौढांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.

बाळाच्या टी-सेल्स केवळ संक्रमित भागातच वेगाने पोहोचत नाहीत, तर त्यांची मजबूत प्रतिकारशक्ती देखील खूप लवकर तयार होते. या अभ्यासाचे निष्कर्ष सायन्स इम्युनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

हे वाचा - वाघोबानं वधू-वरासह वऱ्हाडींची केली हवा टाईट, घरातच बांधावी लागली लग्नगाठ

संशोधकांनी सांगितले की, आम्ही अशा टी-सेल्स शोधत आहोत ज्या यापूर्वी कधीही सक्रिय झाल्या नव्हत्या. परंतु, हे परिणाम आश्चर्यकारक होते की त्यांचे वर्तन वयानुसार भिन्न होते. यावरून दिसून येते की मुलांची रोगप्रतिकारक प्रौढांपेक्षा शक्ती मजबूत आहे.

First published:

Tags: Health, Health Tips