मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नकुशी नाही आता हवीशी! एकच मुलगी असणाऱ्या कुटुंबात महाराष्ट्रात मुंबई टॉप

नकुशी नाही आता हवीशी! एकच मुलगी असणाऱ्या कुटुंबात महाराष्ट्रात मुंबई टॉप

एका सर्वेक्षणानुसार लैंगिक भेदभावामुळे प्रत्येकी सहाव्या मुलीचा मृत्यू होतो आहे, मात्र देशात मुलींची संख्या वाढते आहे.

एका सर्वेक्षणानुसार लैंगिक भेदभावामुळे प्रत्येकी सहाव्या मुलीचा मृत्यू होतो आहे, मात्र देशात मुलींची संख्या वाढते आहे.

एका सर्वेक्षणानुसार लैंगिक भेदभावामुळे प्रत्येकी सहाव्या मुलीचा मृत्यू होतो आहे, मात्र देशात मुलींची संख्या वाढते आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर : लैंगिक समानतेचं (Gender Equality)  म्हणाल, तर भारताची अजूनही अशाच देशांमध्ये गणती होते, जिथं लैंगिक भेदभाव केला जातो. भारतात लैंगिक भेदभावामुळे होणारे मुलींचे (girl) मृत्यू, महिलांवरील अत्याचार आजही सुरूच आहेत. मात्र International Institute for Population Sciences ने केलेल्या अभ्यासात भारताचं काही वेगळंच चित्र दिसून आलं आहे. लैंगिक भेदभावामुळे प्रत्येकी सहाव्या मुलीचा मृत्यू होतो आहे, मात्र तरी देशात मुलींची (daughter) संख्या वाढते आहे. मुंबईमधील जनसंख्या विज्ञान संस्थानचे प्रोफेसर हरिहर साहू आणि रंगासामी नागराजन यांच्या नेतृत्वात हा अभ्यास करण्यात आला. 1992 पासून 2016 पर्यंत सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये 8 लाख 88 हजार कुटुंबांतील जवळपास 10 लाख महिलांनी सहभाग नोंदवला. निरक्षर, साक्षर, धार्मिक आणि जातीय आधारांवर स्वतंत्र संशोधन करण्यात आलं. संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार, वर्षभरात 1 कोटी 20 लाख मुलींचा जन्म होत आहे. पण 15 वर्षांच्या होईपर्यंत यामधील 30 लाख मुलींचा मृत्यू होत आहे. यामधील प्रत्येक सहाव्या मुलीचा मृत्यू लैंगिक भेदभावामुळे होतो. तरी गेल्या तीन दशकांपासून मुलींची संख्या वाढते आहे. याचं कारण म्हणजे मुलींबाबत असणारं मत बदललं आहे. मुलगाच हवा हा अट्टाहासदेखील कमी होताना दिसून येत आहे. मुलगी-मुलामध्ये फारसा फरक लोकांना आता वाटत नाही. हे वाचा - आता Bachelor पुरुष कोरोनाच्या टार्गेटवर; संशोधनात धक्कादायक माहिती समोर 1992 मध्ये ज्यांना तीन मुली होत्या आणि मुलगा नव्हता अशा जोडप्यांचं प्रमाण 20 टक्के होतं. त्यावेळी 16 टक्के कुटुंबच कुटुंब नियोजनाची शस्रक्रिया करत होते. मात्र सरकारद्वारे करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे आणि बदलत्या विचारामुळे 30 वर्षांनी हा आकडा 34 टक्क्यांवर पोहोचला.  शहर आणि गावातीलं उच्च शिक्षित कुटुंबात मुली हव्या असणाऱ्यांचं प्रमाण 1.6 पटीवरून 2.2 पट झालं आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्रात एक मुलगी असणारी 26% कुटुंबं, दोन मुली असणारी 63.4% कुटुंबं तर तीन मुली असणारी 71.5% कुटुंबंं आहेत. एक मुलगी असलेल्या कुटुंबाच्या बाबतीत मुंबई टॉपवर आहे. मुंबईत 47.7% कुटुंबं अशी आहेत, ज्यांच्या घरात एक मुलगी आहे. केरळमध्ये एक मुलगी असलेली 36.8%, दोन मुली असलेली  85% आणि तीन मुली असलेली 84.9% कुटुंबं आहेत. एक मुलींच्या बाबत पलक्कड शहर 70.3 टक्क्यांनी टॉपवर आहे. हे वाचा - कोरोनामुळे डेंग्यूकडे करू नका दुर्लक्ष; 75 टक्के रुग्णांमध्ये दिसत नाहीत लक्षणं हरयाणामध्ये आणि पंजाबमध्ये लैंगिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र आता या राज्यातही चित्रं बदलताना दिसतं आहे. पंजाबमध्ये 2001 मध्ये 1000 मुलांच्या मागे 798 मुली होत्या. 2011 मध्ये ती संख्या 846 इतकी झाली. तर हरयाणामध्ये 2001 मध्ये 1000 मुलांमागे 819 मुली होत्या ती वाढून 2011 मध्ये ती 830 इतकी झाली. हरयाणात एक मुलगी असलेली  27.3%, दोन मुली असलेली 41.4% आणि तीन मुली असलेली 40.6% कुटुंबं आहेत. इथं पंचकुला 43.4 टक्क्यांनी टॉपवर आहे. तर पंजाबमध्ये दहा वर्षांत एक मुली असलेल्या कुटुंबं 21%, दोन मुली असलेली कुटुंबं 37% आणि तीन मुली असलेलीकुटुंबं 45 टक्क्यांपर्यंत वाढली आहेत. एका मुलासाठी कुटुंब नियोजन न करणाऱ्या महिलांची संख्या आजही जास्त आहे. मात्र दोन मुलांच्या जन्मानंतर जवळपास 60 दाम्पत्य तिथंच थांबण्यास प्राथमिकता देतात आणि हा सकारात्मक बदल आता दिसून येतो आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Parents and child

    पुढील बातम्या