Home /News /lifestyle /

तुमचंही किचन छोटं असेल तर या गोष्टी नक्की वापरून बघा; कशी झटपट कामं होतील

तुमचंही किचन छोटं असेल तर या गोष्टी नक्की वापरून बघा; कशी झटपट कामं होतील

तुमचे स्वयंपाकघरही लहान असेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात अशी महत्त्वाची आणि स्मार्ट उपकरणे ठेवावीत, जी कमी जागेत बसतात आणि तुमचे काम सोपे करतात. अशा काही स्मार्ट उपकरणांची आज माहिती घेऊया.

    मुंबई, 15 जुलै : आपल्यापैकी अनेकजणांच्या घरात राहतात अगदी लहान स्वयंपाकघर असतं. त्यासाठी मग आपल्याला काही स्मार्ट उपाय शोधावे लागतात. किचनमध्ये जागा कमी असल्याने लोक त्यांचे ड्रॉवर, स्टोरेज वगैरे स्मार्टपणे सेट करतात, त्यामुळे कामेही सहज करता (kitchen Tips) येतात. जर तुमचे स्वयंपाकघरही लहान असेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात अशी महत्त्वाची आणि स्मार्ट उपकरणे ठेवावीत, जी कमी जागेत बसतात आणि तुमचे काम सोपे करतात. अशा काही स्मार्ट उपकरणांची आज माहिती घेऊया. याबाबत हरजिंदगी या पोर्टलने माहिती दिली आहे. इंस्टेंट पॉट - इन्स्टंट पॉट हे प्रेशर कुकरसारखे असते. अलिकडे ते भरपूर लोकप्रिय झाले आहे, आपणही याबद्दल बरेच काही ऐकले असेल. प्रेशर कुकरप्रमाणे, इन्स्टंट पॉट ओलावा सील करतो आणि तापमान वाढल्यावर वाफेत बदलते. हे पाणी कमी वापरते आणि कमी वीज वापरते. यामध्ये तुम्ही भात, डाळी यापासून अनेक भाज्या तयार करू शकता. त्यामुळे किचनमध्ये 3 ते 4 कुकर आणि पॅन ठेवण्याऐवजी इन्स्टंट पॉट ठेवून स्वयंपाकघर स्मार्ट बनवता येईल. स्नॅक मेकर विशेषत: लहान मुलांसाठी आपल्या काही स्नॅक पदार्थ बनवावे लागतात. यामध्ये अनेकांचा भरपूर वेळ मोडतो. मात्र, हे काम जर मशीनने केले तर विचार करा तुमचा किती वेळ वाचेल? हात घाण न करता तुम्ही स्नॅक्सचे मिश्रण बनवू शकता. स्नॅक्स बनवण्यासाठी या मिनी मेकरमध्ये ठेवा. हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेस शेप देखील मिळतात, ज्यामुळे तुम्ही तुम्हाला हवा असलेला कोणताही स्नॅक बनवू शकता. हे वापरण्यासही सोपे आहे कारण त्यात स्नॅकसाठी पीठ टाकून ते हळूहळू हलत राहते. त्यात आपण नमकीन, चकली, शेव, फरसाण इत्यादी बनवू शकतो. फूड प्रोसेसर - फूड प्रोसेसर तुम्हाला खूप मदत करू शकतो. त्यात चिरणे, मिश्रण करणे, काप करणे, दळणे, प्युरी करणे, फेटणे अशा अनेक गोष्टी तुम्ही सहजपणे करू शकाल. तुमचे स्वयंपाकघर स्मार्ट बनवण्यासाठी हे एक चांगले उपकरण आहे. तुम्हाला कदाचिक माहीत नसेल त्यात पीठ मळूनही घेऊ शकता. यामुळे तुमचा बराच वेळ वाचतो ज्यामुळे तुम्ही लवकर अन्न बनवू शकता. यासाठी नेहमी चांगला आणि उच्च व्होल्टेज फूड प्रोसेसर घ्या. तसेच तुमच्या प्रोसेसरचे ब्लेड हे अदलाबदल करण्यायोग्य असावेत. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर हँड ब्लेंडर - प्युरी किंवा मिश्रण करण्यापूर्वी आपल्याला ते थंड होण्याची वाट पाहावी लागते, त्यामध्येही आपला वेळ जातो. यासाठी तुमचे स्वयंपाकघर स्मार्ट बनवा आणि घरी आणा हँड ब्लेंडर. जर तुम्ही कढईत किंवा कोणत्याही भांड्यात ग्रेव्ही बनवत असाल तर तुम्ही त्यात ब्लेंडिंग करू शकता. हे जड ब्लेंडरसारखे खूप अवजड नाही आणि आवाजही करत नाही. हे पोर्टेबल आहे त्यामुळे तुम्ही ते सहजपणे कॅरी करू शकता. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा मायक्रोवेव्ह - अन्न गरम करण्यासाठी आपल्याला 4 पॅन काढून गॅसवर गरम करावे लागत असतील ना? कल्पना करा जर तुमच्याकडे चांगला मायक्रोवेव्ह असेल तर तुमचा भांडी धुण्याच्या त्रास किती वाचेल. एकाच प्लेटमध्ये अनेक गोष्टी ठेवून तुम्ही ते ओव्हनमध्ये गरम करू शकता. यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि ते वापरण्यासही अतिशय सोयीचे आहे. मायक्रोवेव्ह (मायक्रोवेव्ह हॅक) मध्ये देखील अन्न जळत नाही आणि ते खूप किफायतशीर आहे. या गोष्टींचा वापर करून आपण किचन स्मार्ट बनवू शकता. कामेदेखील स्मार्ट करू शकता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Food, Lifestyle, Recipie

    पुढील बातम्या