मुंबई, 16 ऑक्टोबर : जगभरात जीन्स न वापरणारा व्यक्ती क्वचितच सापडेल. पण या जीन्समुळे आपल्या आयुष्यावर आणि आरोग्यावर काय परिणाम होतो, याची तुम्हाला माहिती आहे का? आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तूंपैकी अनेक वस्तू या निसर्गामधून येत असतात. त्यामुळे आपण वापरत असलेल्या वस्तूचा निसर्गावर काय परिणाम होतो याची माहिती असणं आवश्यक आहे.
त्याचबरोबर पर्यावरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती कोणत्या पद्धतीचे आणि कसे कपडे घालतात याकडेही लक्ष दयायला हवं. जीन्स वापरणं प्रत्येकाला आवडतं. पण या जीन्सचे सूक्ष्म पार्टीकल नदीमध्ये, तलावामध्ये मिसळल्याने पर्यावरणाला धोका पोहोचू शकतो.
एका नव्या संशोधनामध्ये ही गोष्ट समोर आली आहे. जीन्स धुताना यामधून निघणारे सूक्ष्म पार्टीकल हे खरेतर प्लास्टिकचे असतात. यामध्ये नुकसानदायक केमिकल असतं. याचा माणसाच्या शरीरावर देखील परिणाम होऊ शकतो. यामध्ये पॉलीव्हिनाइल क्लोराइड असतं, जे पाण्यामार्फत माणसाच्या शरीरात गेलं तर कॅन्सर होऊ शकतो. डेनिम हे कॉटन पासून बनवतात. परंतु यामध्ये काही प्रमाणात रसायनांचा देखील वापर केला जातो.
हे वाचा - Homeopathy औषधं घेताय; तुम्ही अशी चूक तर करत नाहीत ना?
ही रसायनं पर्यावरणासाठी आणि मानवी शरीरासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे प्राकृतिक घटकांपासून तयार झालेले कपडे घालण्याचं आवाहन अनेक तज्ज्ञ करत आहेत. तसंच जर तुम्ही जीन्स वापरत असाल तर ती कमीतकमी धुण्याचं आवाहन देखील तज्ज्ञांकडून केलं जात आहे.
का केली जातेय चिंता?
अमेरिका आणि कॅनडामधील काही तलावांच्या तळाशी डेनिम मायक्रोफायबर आढळून आलं होतं. यासंबंधी संशोधन करताना वैज्ञानिकांनी याला जीन्सबरोबर जोडून पाहिलं असता, जीन्समधून हे फायबर बाहेर पडण्याचं प्रमाण जास्त असल्याचं त्यांना आढळून आलं आहे. जीन्समध्ये वापरले जाणारे सिंथेटिक डायदेखील धोकादायक धोकादायक आहेत. एकदा दोन जीन्स धुतल्यास त्यामधून 50 हजार मायक्रो फायबर बाहेर पडतात. यामधील समजा 500 मायक्रो फायबर ट्रीट होत नाहीत आणि पाण्यासोबत जलस्रोतात जातात. तर जगभरातील एकूण जीन्स वापरणाऱ्या व्यक्तींच्या मायक्रोफायबरचा विचार केल्यास ही संख्या किती मोठी असेल.
दरम्यान, जीन्सचा वापर कमी करण्यासाठी अनेक मोठया व्यक्ती आवाहन करत आहेत. अमेरिकी राष्ट्रपती आणि जगभरातील अनेक मोठ्या नेत्यांना 'हाउ डेयर यू' असा प्रश्न विचारणारी पर्यावरण प्रेमी टिनेजर ग्रेटा थनबर्ग हिने जीन्स वापरणं सोडून दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.