मुंबई, 15 मार्च : प्रत्येकाला आपल्या मुलाचं नाव पूर्णपणे वेगळं, युनिक असावं असं वाटतं. नाव सुंदर असलं (Baby Names) पाहिजे, त्याचा अर्थ चांगला असावा आणि ज्याचे सर्वांनी कौतुक केलं पाहिजे, असं वाटतं. मुलाच्या जन्माअगोदरपासूनच आई-वडील नाव शोधू लागतात आणि ही प्रक्रिया नाव ठेवण्याच्या दिवसापर्यंत चालते. हिंदू कुटुंबात मुलाच्या जन्मानंतर पंडितजी नावासाठी काही अक्षरे देतात. त्यानंतरही नावाचा शोध सुरू होतो. आजकाल वेद आणि पुराणांशी संबंधित संस्कृत नावे प्रचलित आहेत. ही नावे कधीच जुनी होत (Baby Names list) नाहीत. याविषयी
हिंदुस्थान टाईम्सने बातमी दिली आहे.
मुलांसाठी भारतीय संस्कृतीची नावे
हे वाचा -
शरीरात अशी लक्षणं दिसत असतील तर सावधान! ही Diabetes ची सुरुवात असू शकते
त्रिजल (भगवान शिव), त्रिपुरेश (शिव), अमरेश (इंद्रदेव), आरव (तेज आवाज) रामायणामध्ये हा शब्द वापरला आहे. आदित्य (सूरज), अभिमन्यु (अर्जुनाचा मुलगा), दक्ष (कोणत्याही कामात माहिर, गुणवान), परिक्षित (ज्याची परीक्षा घेतलेली आहे), कियांश (ज्याच्यामध्ये सर्व चांगले गुण आहेत), इवान (ईश्वराचा पुरस्कार, सूर्य), विवान (सूर्याची किरणं, श्रीकृष्ण), सारस्वत (सरस्वतीचे पती), अभिर (निडर).
हे वाचा -
रात्री जेवल्यानंतर किमान इतका वेळ तरी चालायला हवं; नंतर आजारांवरील वाचेल खर्च
मुलींसाठी भारतीय संस्कृतीची नावे
वेदिका (ज्ञान, एक अप्सरा), गार्गी (विदुषी, देवी दुर्गेप्रमाणे शक्तिशाली), वारिजा (कमळ), वसुंधरा (धरती), दीपशिखा (उज्ज्वल), ईशानी (भगवानी शिवाची पत्नी), एकवीरा (भगवान शिवची मुलगी), वाणी, आहाना (सूर्याचे पहिले किरण), नव्या (उत्साह आणणारी), रुजुता (ईमानदारी), आराध्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.