सकाळी उठल्यावर डोळे का सुजतात? या गोष्टींकडे द्या लक्ष

सकाळी उठल्यावर डोळे का सुजतात? या गोष्टींकडे द्या लक्ष

कधीकधी झोपेची कमतरता किंवा जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे डोळ्यात जळजळ होऊ शकते.

  • Last Updated: Sep 15, 2020 07:57 AM IST
  • Share this:

डोळ्यांची सूज येणे अगदी सामान्य आहे कारण डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा खूपच संवेदनशील असते. एलर्जी, तणाव, थकवा, तसेच डोळ्यांच्या खालील त्वचेत द्रव जमा झाल्याने आणि इतर कारणांमुळे डोळ्यांना सूज येऊ शकते. सकाळी उठल्यावर बर्‍याचदा डोळे सुजलेले दिसतात. जेव्हा आहारात सोडियमचं प्रमाण जास्त होतं तेव्हा शरीरात पाणी साठण्यास सुरुवात होते. कधीकधी झोपेची कमतरता किंवा जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे डोळ्यात जळजळ होऊ शकते. myupchar.com शी बोलताना एम्सचे डॉ. अजय मोहन म्हणतात की, डोळ्यांमध्ये सूज येण्याची लक्षणं म्हणजे डोळ्यांना खाज सुटणे आणि जळजळ होणे, डोळे लाल होणे आणि सूज येणे, जास्त अश्रू येणे, दिसण्यात अडचण येणे, पापण्या कोरड्या होणे, डोळ्याखालील गडद काळं रिंगण येणे अशी आहेत.

डोळ्यांच्या खालची सूज ही वाढत्या वयामुळे देखील असू शकते. या स्थितीचं कारण काहीही असले तरी डोळ्यांची सूज नाहिशी करणं शक्य आहे. डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय मदत करू शकतात.

पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या

myupchar.com चे डॉ.अप्रतिम गोयल म्हणतात की, दररोज किमान 2 ते 3 लिटर पाणी प्यावं. जर डोळे सुजले असतील तर आपण किती पाणी पिताय याकडे लक्ष द्या. भरपूर पाणी प्या कारण त्वचेखाली साठलेलं द्रव त्याच्या जळजळ होण्याचं मुख्य कारण आहे. पुरेसं पाणी प्यायल्यानं शरीरातील द्रव टिकून राहतात आणि ते ऊतींमध्ये जमा होत नाही.

सोडियमचं प्रमाण कमी असावे

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरात द्रव साचतो आणि बर्‍याच अडचणी उद्भवतात. सूज येणं टाळण्यासाठी खाद्य पदार्थांमध्ये मीठ मर्यादित ठेवा.

आहारात जीवनसत्त्वे समाविष्ट करा

अ जीवनसत्त्व डोळ्यांची जळजळ आणि डोळ्याभोवती गडद वर्तुळं निवारण्यासाठी मदत करतं. जीवनसत्त्व कोलेजेनच्या प्रक्रियेस उत्तेजन देतं ज्यामुळे डोळ्यांखाली असलेल्या त्वचेचे आरोग्य सुधारतं. हिरव्या भाज्या, बीट, गाजर आणि चिंचेपासून ते मिळवलं पाहिजे. लिंबू, संत्र इत्यादी आंबट फळं खाल्यानंतर पुरेसे ई जीवनसत्त्व आणि सी जीवनसत्त्व मिळतं. यामुळे डोळ्यांखालील त्वचेत रक्त प्रवाह वाढतो. त्वचेला पुरेसं पोषण मिळतं आणि जळजळ बरी होते. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की जीवनसत्त्व के हिरव्या पालेभाज्या, मोहरीची भाजी, मुळा, गहू, बार्ली, पालक, ऑलिव्ह ऑईल, मोड आलेली कडधान्य यापासून मिळते.

हे वाचा-भूकेसह डोळ्यांची दृष्टी वाढवतं सलगम कंद; जाणून घ्या याचे आणखी फायदे

काकडीचा उपयोग

काकडीचे काप कापून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्याखालची सूज दूर होते. हा सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. खरं तर, याचं कारण असं आहे की काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असतं. त्यात सुमारे 70 टक्के पाणी असतं. काकडी पाण्याची कमतरता कमी करून डोळ्यांखालील सूज दूर करते.

ग्रीन टी बॅग

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे डोळ्यांखालील त्वचेतील जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतात. डोळ्याखाली ग्रीन टी चे पाकीट 10-15 मिनिटे ठेवा. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - डोळ्यांची सूज

न्यूज 18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 15, 2020, 7:57 AM IST

ताज्या बातम्या