मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Muscle Pain: अंगदुखीने त्रस्त असाल तर आहारात करा असा बदल; गोळ्या खाण्यापूर्वी करा हे उपाय

Muscle Pain: अंगदुखीने त्रस्त असाल तर आहारात करा असा बदल; गोळ्या खाण्यापूर्वी करा हे उपाय

अंगदुखी ही एक कॉमन समस्या आहे. कामामुळे, चुकीच्या पद्धतीने हालचाली झाल्यामुळे, दीर्घकाळ बैठे काम केल्याने अंगदुखीचा त्रास सुरू होतो. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की माणसाला रोजची कामे करणे अवघड होऊन जाते.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 27 जून : स्नायू किंवा अंग दुखण्याची अनेक कारणे आहेत. वेदना कमी करण्यासाठी काय करावे काय सुचत नाही आणि मग आपण सरळ वेदनाशामक औषध-गोळ्या घेतो. त्रास कमी करण्यासाठी आपल्याला आहारात बदल करावा लागेल, अन्यथा हा त्रास कायम राहील. जवळपास सर्वांना माहीत आहे की, प्रथिनेयुक्त पदार्थांच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात. कारण प्रथिनांपासून शरीरात नवीन पेशी तयार होतात. अंडी, दूध, दही, अंकुरलेले धान्य इत्यादी प्रथिनेयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करावे. त्यामुळे स्नायूंच्या वेदना हळूहळू कमी होतात. अंगदुखी ही एक कॉमन समस्या आहे. कामामुळे, चुकीच्या पद्धतीने हालचाली झाल्यामुळे, दीर्घकाळ बैठे काम केल्याने अंगदुखीचा त्रास सुरू होतो. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की माणसाला रोजची कामे करणे अवघड होऊन जाते. मात्र, योग्य आहार आणि काही शारीरिक हालचालींनी वेदना कमी करता येऊ शकतात. यानंतरही जर तुमच्या स्नायूंचे दुखणे संपत नसेल तर नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधावा. तेलाने मसाज करणं - काही तेल स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. घरच्या घरी तेलाने मसाज केल्याने अंगदुखी कमी होऊ शकते. मात्र, मसाजसाठी योग्य तेल निवडणे देखील महत्त्वाचे आहे. हे वाचा - ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या मोहरीच्या तेलाने मसाज करा - मोहरीचे तेल आपल्या स्नायूंनाही आराम देऊ शकते. या तेलाने मसाज केल्यास नक्कीच फायदा होईल. याशिवाय मोहरीच्या तेलात लसणाचे तुकडे टाकल्यास खूप फायदा होतो. म्हणजेच, तुम्ही तुमच्या स्नायूंसाठी लसूण तेल देखील वापरू शकता. मोहरीच्या तेलात ओवा टाकून मसाज करा - याशिवाय मोहरीचे तेल आणि ओव्याचा स्नायूंच्या दुखण्यावर उपयोग होतो. मोहरीचे तेल आणि ओव्याने मसाज केल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. हे वाचा - नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा तिळाचे तेलही चालेल - तीळ जसे खायला चविष्ट असते, त्याचप्रमाणे त्याचे तेलही खूप फायदेशीर असते. तिळाच्या तेलाचा प्रभाव गरम असतो. त्यामुळे त्याने मसाज करणे खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे आपल्या स्नायूंमधील वेदना कमी होतील, तसेच क्रॅम्प्समध्येही आराम शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या