मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'ही' पाच लक्षणं दिसली, तर तातडीने करून घ्या डोळ्यांची तपासणी

'ही' पाच लक्षणं दिसली, तर तातडीने करून घ्या डोळ्यांची तपासणी

आपण अशी पाच लक्षणं पाहू या, जी दिसली, तर तातडीने डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे याची नोंद घ्यावी.

आपण अशी पाच लक्षणं पाहू या, जी दिसली, तर तातडीने डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे याची नोंद घ्यावी.

आपण अशी पाच लक्षणं पाहू या, जी दिसली, तर तातडीने डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे याची नोंद घ्यावी.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

लेखक : डॉ. महेश एस., मुख्य वैद्यकीय अधिकारी, कॅटॅरॅक्ट अँड ट्रॉमा, शंकरा आय हॉस्पिटल, शिमोगा

आपण जशी वार्षिक सुट्टी घेतो, तसंच वार्षिक आरोग्य तपासणी करणंही खूप महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने, अनेक जण आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण व्हायला सुरुवात होईपर्यंत आरोग्य तपासणी करतच नाहीत. वय किती असलं, तरी डोळ्यांची नियमित तपासणी का करायला हवी?

डोळ्यांची नियमित तपासणी दृष्टी तर चांगली ठेवतेच; पण त्यातून डोळ्यांचा काही आजार असल्यास त्याचंही निदान होतं. अन्यथा बराच काळ ते लक्षातच येत नाहीत.

आता आपण अशी पाच लक्षणं पाहू या, जी दिसली, तर तातडीने डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे याची नोंद घ्यावी.

दृष्टीत फरक पडल्याचं जाणवणं : पूर्वीच्या तुलनेत अस्पष्ट दिसत असल्याचं प्रमाण वाढल्याचं जाणवलं किंवा मेन्यूवर लिहिलेल्या पदार्थांची यादी वाचण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत आहेत असं वाटलं किंवा वाहन चालवताना डोळ्यांवर अधिक ताण द्यावा लागतोय असं वाटलं, तर संपूर्ण नेत्रतपासणी करण्यासाठी नेत्रतज्ज्ञांकडे जायची वेळ आली आहे, याची मनाशी खूणगाठ बांधावी. अस्पष्ट दिसणं हे ग्लॉकोमासारख्या अन्य गुंतागुंतीच्या समस्येचंही लक्षण असू शकतं.

वारंवार दुखी

काही वेळा असं होतं, की दृष्टी नॉर्मल असते; मात्र वारंवार डोकेदुखी किंवा डोळ्यांत वेदना होण्याचा अनुभव येतो किंवा ताण आल्यासारखं वाटतं. हे दृष्टीत फरक पडल्याचे किंवा अन्य समस्यांचे संकेत आहेत. त्यांच्याकडे तातडीने लक्ष द्यावं. वारंवार डोकं दुखणं हे पाहण्यासाठी डोळ्यांवर अधिक ताण दिला जात असल्यामुळे घडू शकतं.

डायबेटिक असलात तर...

डायबेटीस अर्थात मधुमेह हा असा विकार आहे, की तो डोळ्यांवर विपरीत परिणाम करतो, हे सर्वज्ञात आहे. त्यातून वेगवेगळ्या प्रकारची गुंतागुंत होऊ शकते. अंधपणाही येऊ शकतो. डायबेटीस असलेल्यांना डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते. त्यामुळे दृष्टी कमी होते किंवा अंधपणाही येऊ शकतो.

रेटिना नावाचा प्रकाशाला संवेदनशील अशा टिश्यूजचा थर डोळ्यांच्या मागच्या बाजूला असतो. त्या रेटिनामधल्या रक्तवाहिन्यांवर याचा परिणाम होतो. डायबेटिक व्यक्तींनी वर्षातून किमान एकदा कॉम्प्रिहेन्सिव्ह डायलेटेड आय एक्झाम अर्थात सर्वसमावेशक नेत्रतपासणी करणं गरजेचं आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीची लक्षणं कदाचित सुरुवातीच्या काळात दिसत नाहीत; मात्र निदान लवकर झाल्यास दृष्टी वाचवण्यासाठी संरक्षक पावलं उचलण्यास मदत होते.

भारतात येणार महाभयंकर आजाराची त्सुनामी; तज्ज्ञांनी व्यक्त केली मोठी भीती

डोळ्यांत वारंवार पाणी येणं/कायमचा लालपणा

डोळ्यांत वारंवार पाणी येणं किंवा डोळ्यांना लालपणा जाणवणं यामागे अनेक कारणं असू शकतात. वारंवार धुळीच्या संपर्कात असल्याने अ‍ॅलर्जी होणं किंवा कन्जक्टिव्हायटिससारखे संसर्ग होणं यांमुळे तसं होऊ शकतं. कॉर्नियामध्ये संसर्ग झाल्यानेही तसं होऊ शकतं.

नेत्ररोगाचा कौटुंबिक इतिहास

रेटिनोब्लास्टोमा, ग्लॉकोमा यांसारखे नेत्रविकार आनुवंशिक असू शकतात. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास माहिती असणं आणि त्या दृष्टीने जागरूक असणं गरजेचं आहे. म्हणजेच डोळ्यांच्या आनुवंशिक विकारांची लक्षणं माहिती असणं, त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

दीर्घायुष्याचं रहस्य कळलं? वाचा, शास्त्रज्ञांना काय आढळून आलं?

एकंदरीत सांगायचं, तर यांपैकी कोणतीही लक्षणं दिसत नसली तरी आणि वय कितीही (जास्त किंवा कमी) असलं तरी, नियमित नेत्रतपासणी करणं एकंदर आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं.

First published:

Tags: Eyes damage, Health, Health Tips