मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुमच्या पाळीव कुत्र्या सारखे दिसल्यास मिळेल बक्षीस, अशी आहे स्पर्धा!

तुमच्या पाळीव कुत्र्या सारखे दिसल्यास मिळेल बक्षीस, अशी आहे स्पर्धा!

कित्येक श्वानप्रेमी आपल्या कुत्र्यांना भलतीच विशेष वागणूक देतात. याबाबतचे कित्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral dog house video) होत असतात.

कित्येक श्वानप्रेमी आपल्या कुत्र्यांना भलतीच विशेष वागणूक देतात. याबाबतचे कित्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral dog house video) होत असतात.

कित्येक श्वानप्रेमी आपल्या कुत्र्यांना भलतीच विशेष वागणूक देतात. याबाबतचे कित्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral dog house video) होत असतात.

  मुंबई, 16 ऑक्टोबर : कुत्रा पाळणारे लोक आपल्या पाळीव श्वानावर भरपूर प्रेम करत असतात. कित्येक लोक तर आपल्या श्वानांना कुटुंबातील सदस्यच मानतात. हे लोक केवळ आपल्या कुत्र्याच्या आरोग्याबाबत नाही, तर त्यांच्या दिसण्याबाबतही (Pet Dog looks) जागरूक असतात. त्यांना नियमितपणे विशेष सलूनमध्ये नेऊन खास हेअरस्टाईल (Dog hairstyles) करून घेतात, त्यांच्यासाठी खास कपडे बनवून घेतात आणि आपल्या श्वानांचे छान छान फोटो (Cute Dog pictures) सोशल मीडियावरही पोस्ट करतात. अशाच श्वानप्रेमींसाठी एका वेबसाईटने खास स्पर्धा आय़ोजित केली आहे.

  टीमडॉग्ज (Teamdogs) या वेबसाईटने ही विशेष स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वानासोबत ट्विनिंग करावे लागणार आहे. म्हणजेच, तुम्हाला तुमच्या श्वानासोबत असा फोटो (Click picture with dogs) घ्यायचा आहे ज्यात दोघांचा लुक (Dog lookalike contest) सारखाच असावा. यातील सर्वात चांगलं ट्विनिंग करणाऱ्या (Twinning with your dog) मालक-श्वान जोडीला या वेबसाईटतर्फे बक्षीस देण्यात येणार आहे. तुम्हालाही या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल, तर या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरता येईल.

  बापरे! प्रायव्हेट पार्टच शरीरावेगळा केला; शार्कचा भयंकर हल्ला, तरुणाचा मृत्यू

  कित्येक श्वानप्रेमी आपल्या कुत्र्यांना भलतीच विशेष वागणूक देतात. याबाबतचे कित्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral dog house video) होत असतात. काही दिवसांपूर्वी टिकटॉकवर एका यूझरने (@bam12008) असाच एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये दिसून येतं, की त्या व्यक्तीने आपल्या श्वानांसाठी स्वतंत्र बैठकीची खोली (Living room for pet dogs) तयार करून घेतली होती. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती अमेरिकेतील फ्लोरिडाची (Florida pet dog video) रहिवासी आहे.

  टिकटॉकवरील हा व्हिडिओ आता इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होतो आहे. यात दिसून येतंय की, श्वानांसाठी तयार करण्यात आलेल्या या लिव्हिंग रूममध्ये (Dog living room viral video) एका साध्या घरात असतील त्यापेक्षाही अधिक चांगल्या सोयी आहेत. या व्यक्तीने आपल्या तीन कुत्र्यांसाठी वेगळे वेगळे सोफे तयार करून घेतले आहेत. हे तीनही डॅक्सहंड (Dachshunds) जातीचे कुत्रे आहेत.

  उपवास आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जाणून घ्या...

  पीचेस (Peaches), मिट्झी (Mitzi) आणि चाल्लाह (Challah) अशी या तीन श्वानांची नावे आहेत. विशेष म्हणजे कुत्र्यांना करडा, पिवळा आणि निळा हे तीनच रंग उत्तमरित्या पाहता येतात. त्यामुळे या व्यक्तीने आपल्या कुत्र्यांसाठी या तीन रंगांचे बनवून घेतले आहेत. एवढंच नाही, तर या रूममध्ये कुत्र्‍यांसाठी (TV, Sofa for pet dogs) टीव्ही, पेंटिंग, लॅम्प आणि चक्क एक बारदेखील आहे. दचकू नका! हा बार काही खराखुरा नाही. या व्यक्तीने कुत्र्यांच्या खोलीतील एका कपाटाला बारचा लुक दिला आहे.

  तुम्हालाही आपल्या कुत्र्याला छानपैकी नटवायला, आणि त्याच्यासोबत फोटो काढायला आवडत असेल; तर टीमडॉग्जच्या वेबसाईटवर आपले नाव नोंदवून या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. स्पर्धेबाबत अधिक माहिती तुम्हाला वेबसाईटवरच मिळेल!

  First published: