मुंबई, 26 मार्च : नोटबंदीनंतर 100 रुपयांच्या (Rs. 100 note) जुन्या नोटेवर बंदी घालण्यात आली. पण अजूनही काही जणांकडे 100 रुपयांची ही जुनी नोट (Old currency note) आहे. काही कारणांमुळे त्यावेळी ती वापरात आली नाही. तर काही जणांनी ती आठवण म्हणून जपून ठेवली आहे. तुमच्याकडेसुद्धा अशी शंभर रुपयाची (Rs. 100) जुनी नोट असेल तर तुमच्यासाठी मोठी सुवर्णसंधी आहे. या जुन्या नोटेमुळे तुम्ही मालामाल होऊ शकता.
100 रुपयांची जी नोट आता जुनी आणि कालबाह्य झाली आहे, त्या नोटेला तितकंच मूल्यही आलं आहे. एक नोट तुम्हाला तब्बल 50,000 रुपये मिळवून देऊ शकते. आता हे कसं शक्य आहे, तर ही प्रक्रिया समजून घ्यावा. 100 रुपयांच्या नोटेचं 50,000 रुपयांमध्ये रुपांतर करण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागेल ते पाहू.
हे वाचा - 1 April पासून दूध, एसी, टीव्हीसह या गोष्टी महागणार; तुमच्यावर काय परिणाम होणार
तुम्ही तुमच्याकडे असलेली 100 ची नोट घरबसल्याच ऑनलाइन विकू शकता. इंडियामार्ट शॉपक्लूज आणि मरुधर आर्ट्सवर या नोटेला चांगली मागणी आहे. इथं तुम्हाला या नोटेसाठी चांगली किंमत मिळेल.
इंडियामार्टवर 100 रुपयांच्या एका नोटेचं मूल्य 50 हजार रुपये आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार तुमच्या या नोटेवरील टाइम पीरिअड 19 वं शतक असावं, ही नोट कागदी असावी आणि त्याचा सीरिअल नंबर 6C*989013 तर आयटम कोड 161439066 असायला हवा.
हे वाचा - LIC ग्राहकांसाठी खूशखबर! 6 महिन्यांसाठी नाही द्यावा लागणार गृहकर्जाचा EMI
फक्त 100 रुपयांची नोटच नाही तर 5 आणि 10 रुपयांचं नाणंही तुम्हाला चांगली कमाई करून देईल. फक्त त्यावर वैष्णोदेवीची प्रतीमा असायला हवी. 2002 साली वैष्णो देवीची प्रतीमा असलेली नाणी जारी करण्यात आली. हिंदू धर्मात माता वैष्णो देवीची पूजा केली जाते. वैष्णो देवीची प्रतीमा असल्याने या नाण्याला शुभ मानलं जातं. त्यामुळे असं नाणं आपल्याकडे हवं यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money