मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Itchy Ears: कानाला वारंवार खाज सुटण्यामुळे त्रस्त झालाय? या घरगुती उपायांनी लगेच मिळवा आराम

Itchy Ears: कानाला वारंवार खाज सुटण्यामुळे त्रस्त झालाय? या घरगुती उपायांनी लगेच मिळवा आराम

सतत खाज सुटत असल्यास कान वारंवार खाजवला जातो. यामुळं कधी कधी जखमाही होऊ शकतात. कानात खाज येणं ही बाब सामान्य आहे. परंतु, जेव्हा जास्त काळ खाज सुटते, तेव्हा ती धोकादायक स्थिती असू शकते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर :  कानात सतत खाज सुटत असल्यास कान वारंवार खाजवला जातो. यामुळं कधी कधी जखमाही होऊ शकतात. कानात खाज येणं ही बाब सामान्य आहे. परंतु, जेव्हा जास्त काळ खाज सुटते, तेव्हा ती धोकादायक स्थिती असू शकते. कधी कानात पाणी गेल्यानं खाज सुटते. तर, कधी संसर्गामुळं किंवा कोरडेपणामुळं. तुम्हालाही कानात वारंवार खाज येत असेल तर आम्ही त्यावर घरगुती उपाय सांगत आहोत. कानाची खाज कशी दूर करायची (Home Remedies for Itchy Ears) याविषयीची झी न्यूजनं दिलेली माहिती जाणून घेऊया.

कानाला खाज सुटण्यासाठी घरगुती उपाय

त्वचेच्या कोरडेपणामुळं कानात खाज येत असेल तर ऑलिव्ह ऑईल किंवा बेबी ऑइलचे काही थेंब कानात टाकल्यास आराम मिळेल.

जर कानात मेण अडकून राहिलं असेल तर त्यामुळं खाज सुटू शकते. अशा परिस्थितीत, बेबी ऑइलचे काही थेंब किंवा ओव्हर-द-काउंटर (OTC) इअर ड्रॉप्स वॅक्स कानात सोडले जाऊ शकतात.

कानातील खाज दूर करण्यासाठी कापसाचे बडस् किंवा माचिसच्या काडीचा वापर करू नका. मोहरीच्या तेलाने किंवा कोणत्याही चांगल्या तेलानं बडस् ओले करून कानात लावल्यास खाज सुटण्यावर आराम मिळेल आणि कान कोरडे पडणार नाहीत.

हे वाचा - Fruit with Meals: आयुर्वेदानुसार जेवणासोबत फळे का खायची नसतात, जाणून घ्या त्याचे कारण

सोरायसिसमुळे कानाला खाज येत असेल, तर अशा परिस्थितीत ओव्हर-द-काउंटर औषधांची आवश्यकता असू शकते.

पोहताना कानात पाणी गेलं असेल तर अल्कोहोलयुक्त व्हिनेगरचे काही थेंब कानात सोडता येतील. यामुळं खाज येत असल्यास आराम मिळू शकतो. तसंच कानातलं अतिरिक्त पाणी सुकण्यास मदत होते.

अ‌ॅलर्जिक राहिनाइटिसमुळे (Allergic rhinitis) खाज येत असेल तर आहार बदला. या स्थितीत काही अन्नपदार्थ खाज सुटण्यास कारणीभूत ठरू शकतात.

हे वाचा - Mental health: डिप्रेशनमध्ये जाण्याची ही असतात लक्षणं; त्यातून बाहेर काढण्यासाठी मित्र, नातेवाईकांना अशी करा मदत

कोणत्याही घरगुती उपायांनी आराम मिळत नसल्यास किंवा कानात वेदना किंवा ऐकू न येणे यासारखी गंभीर लक्षणं जाणवत असल्यास आणि यासोबतच सतत खाज येत असेल तर, लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips