मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दूध आवडत नसेल तर शाकाहारी लोकांनी हे 6 पदार्थ खा; कॅल्शियम कधी कमी नाही पडणार

दूध आवडत नसेल तर शाकाहारी लोकांनी हे 6 पदार्थ खा; कॅल्शियम कधी कमी नाही पडणार

19 ते 50 वयोगटातील बहुतेक प्रौढांना दररोज 1,000 mg कॅल्शियमची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येकाने चीज, दही, दूध यांचे सेवन करावे, कारण त्यात कॅल्शियम सर्वाधिक असते. पण, दूध अनेकांना आवडत नाही, अशा लोकांनी दुधाव्यतिरिक्त कोणते पदार्थ खावेत जाणून घेऊया.

19 ते 50 वयोगटातील बहुतेक प्रौढांना दररोज 1,000 mg कॅल्शियमची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येकाने चीज, दही, दूध यांचे सेवन करावे, कारण त्यात कॅल्शियम सर्वाधिक असते. पण, दूध अनेकांना आवडत नाही, अशा लोकांनी दुधाव्यतिरिक्त कोणते पदार्थ खावेत जाणून घेऊया.

19 ते 50 वयोगटातील बहुतेक प्रौढांना दररोज 1,000 mg कॅल्शियमची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येकाने चीज, दही, दूध यांचे सेवन करावे, कारण त्यात कॅल्शियम सर्वाधिक असते. पण, दूध अनेकांना आवडत नाही, अशा लोकांनी दुधाव्यतिरिक्त कोणते पदार्थ खावेत जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जून : जे लोक शाकाहारी आहेत त्यांना कॅल्शियमसारख्या आवश्यक पोषक घटक मिळवण्यासाठी दूध आणि दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टींचा वापर करावा, हे सहसा समजत नाही. काही लोकांना जास्त दूध, दही, चीज इत्यादी खायला आवडत नाही. अशा परिस्थितीत मग कोणत्या गोष्टींमधून कॅल्शियम मिळेल, हे जाणून घेणे आवश्यक आहे. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त, हे खनिज स्नायूंच्या आकुंचनासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, मज्जातंतूंचे संक्रमण आणि रक्त गोठण्यास महत्त्वपूर्ण आहे. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या माहितीनुसार, TOI मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 19 ते 50 वयोगटातील बहुतेक प्रौढांना दररोज 1,000 mg कॅल्शियमची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येकाने चीज, दही, दूध यांचे सेवन करावे, कारण त्यात कॅल्शियम सर्वाधिक असते. मात्र, कोणाला या गोष्टी आवडत नसतील तर कोणते पदार्थांनी तुमचे रोजचे कॅल्शियमचे प्रमाण पूर्ण होईल, त्याविषयी जाणून घेऊया. शाकाहारी लोकांनी कॅल्शियमसाठी हे पदार्थ खा - जर तुम्हाला जास्त दूध, दही खायला आवडत नसेल तर तुम्ही कॅल्शियमसाठी सोया मिल्कचे सेवन करू शकता. सोयाबीनमध्ये भरपूर कॅल्शियम असते. एक कप फोर्टिफाइड सोया दुधात एक कप गाईच्या दुधाइतकेच कॅल्शियम असते. कॅल्शियम व्यतिरिक्त, तुम्ही सोया दुधाने व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर देखील मात करू शकता. रोज वाळलेल्या अंजीराचे सेवन सहसा आपण करत नाही, पण जर कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्ही दूध, दह्याऐवजी वाळलेल्या अंजीराचेही सेवन करू शकता. यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. तसेच, याच्या सेवनामुळे आपल्याला जास्त वेळ भूक लागत नाही, वजन वाढण्यासही प्रतिबंध करते. जर तुम्ही 7-8 अंजीर खाल्ले तर तुम्हाला सुमारे 240 मिलीग्राम कॅल्शियम मिळेल. अनेक प्रकारचे ड्रायफ्रुट्स देखील कॅल्शियमने समृद्ध असतात, त्यापैकी एक बदाम आहे. यामध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे तुम्ही स्नॅक म्हणून खाऊ शकता. त्यात तांबे, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियमही चांगल्या प्रमाणात असते. एक कप बदामामध्ये सुमारे 378 मिलीग्राम कॅल्शियम असते. हे वाचा - नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा लोक वजन कमी करण्यासाठी चिया बियांचे सेवन करतात, परंतु ते कॅल्शियमची कमतरता देखील दूर करू शकते. आहारात चिया बियांचा समावेश केल्यास कॅल्शियमची कमतरता दूर करता येते. पाणी, दूध, स्मूदी, सॅलड इत्यादींमध्ये घालून सेवन करा. त्यात अँटिऑक्सिडेंट असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. यामध्ये फायबर जास्त असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यात कॅल्शियम आणि बोरॉन असतात, जे स्नायू आणि हाडांसाठी आवश्यक असतात. हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसचे चयापचय करण्यास मदत करते. तुम्ही चिया बिया स्मूदी, ओटमील इत्यादींमध्ये मिसळून खाऊ शकता. 2 चमचे चिया बियांमध्ये सुमारे 179 मिलीग्राम कॅल्शियम असते. टोफू हा सोयाबीनपासूनच बनवला जातो, त्याला कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत मानला जातो. एका कप टोफूमध्ये सुमारे 870 मिलीग्राम कॅल्शियम असते. यासोबतच यामध्ये प्रोटीन देखील असते. हे वाचा - ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही वर नमूद केलेल्या पदार्थांसोबत ब्रोकोली, सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करू शकता. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम इत्यादी असतात, जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर भाज्या आहेत. 100 ग्रॅम ब्रोकोलीमध्ये सुमारे 47 मिलीग्राम कॅल्शियम असते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या