मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /औषधांमुळे गेली तोंडाची चव? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, एरंडेल तेल ठरेल फायद्याचं

औषधांमुळे गेली तोंडाची चव? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, एरंडेल तेल ठरेल फायद्याचं

Tips to Get Smell And Taste: आजारपणामुळे तोंडाची चव आणि वास घेण्याची क्षमता कमी झाली असेल तर, घरातले काही पदार्थ वापरा.

Tips to Get Smell And Taste: आजारपणामुळे तोंडाची चव आणि वास घेण्याची क्षमता कमी झाली असेल तर, घरातले काही पदार्थ वापरा.

Tips to Get Smell And Taste: आजारपणामुळे तोंडाची चव आणि वास घेण्याची क्षमता कमी झाली असेल तर, घरातले काही पदार्थ वापरा.

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : आराजी झाल्यावर होणाऱ्या अनेक समस्यांमधील एक त्रास म्हणजे बरं झाल्यावरही वास आणि चव (Smell & Taste) घेण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे कोणत्याही पदार्थाचा वास घेतल्यास वास येत नाही किंवा खाल्ल्यावर त्याचीही चव कळत नाही. त्यामुळे जेवणावरची इच्छा उडते. अशावेळी वास आणि चवीची शक्ती परत आणण्यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies) करू शकता. वास आणि चव गमावण्याचे कारण काय असू शकते आणि ते परत आणण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहूयात.

वासा घेण्याची क्षमता कमी होणे

नाक किंवा घशाचा संसर्ग (Infection), अ‍ॅलर्जी (Allergy), एंडोक्राइन डिसऑर्डर, डोके किंवा नाकाला दुखापत, सायनस शस्त्रक्रिया यामुळे वास घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.

चव जाण्याचं कारण

र्दी, बेल्स पाल्सी, फ्लू आणि इतर व्हायर इन्फेक्शन, फॅरिन्जाइटिस, स्ट्रेप थ्रोट, लाळेच्या ग्रंथीमध्ये इन्फेक्शन किंवा डोक्याला झालेली दुखापत यामुळे तोंडाची चव कमी होऊ शकते.

(भात खाल्ल्यावर सुस्ती येते? दुपारी जेवल्यावर येणारी झोप टाळण्यासाठी हे करा)

वास आणि चव येण्यासाठी हे घरगुती उपाय कराएरंडेल तेल

एक चमचा एरंडेल तेल गरम करा. या तेलाचे काही थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये आळीपाळीने टाका. दिवसातून एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा हा उपाय करा. यामुळे चव आणि वास कमी होण्याची समस्या दूर होईल.

लसूण

तोंडाची चव आणि वास कमी झाला असेल तर, लसूणही वापरता घेऊ शकतो. यासाठी लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या सोलून घ्या आणि बारीक चिरा. एका भांड्यात एक कप पाणी घेऊन त्यात चिरलेला लसूण घाला. काही  मिनिटं हे पाणी उकळू द्या. पाणी कोमट होईपर्यंत असंच ठेवा. पाणी कोमट झाल्यावर चहाप्रमाणे प्या.

(गरज नाही टेरेसची! ऑगस्ट महिन्यात कोबी,गाजर,बीट लावा कुंडीत)

आलं

वासाची आणि चवीची शक्ती परत आणण्यासाठी तुम्ही आलं वापरू शकता. यासाठी, थोडं आलं धुवून पुसून घ्या दिवसभर मध आणि आलं चघळत रहा. आवडत असेल तर, आल्याचा चहा देखील घेऊ शकता.

लिंबू

लिंबू सुद्धा फायदेशीर आहे. अर्ध्या लिंबाचा रस एका ग्लास पाण्यात मिसळा. नंतर त्यात अर्धा चमचा मध घालून प्यायला सुरुवात करा. जेवणाआधी दिवसातून दोनदा ही प्रक्रिया पुन्हा करा.

(घरात लावलेल्या झाडांमुळेही मिळते Positive Energy; गुलाब, चमेली लावून तर बघा)

अ‍ॅपल साडर व्हिनेगर

हा त्रास संपवण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगरची मदत घेऊ शकता. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि काही थेंब मध मिसळा. हे मिश्रण चहासारखं हळूहळू प्या.

First published:

Tags: Health Tips, Home remedies, Lifestyle