विमानातून प्रवास करताना या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

विमानातून जाताना नक्की काय घेऊन जायचं आणि त्यासाठीची तयारी कशी करायची याबद्दल काही कल्पना नसते. तसेच प्रवासादरम्यान कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला तर काय करावं असाही प्रश्न मनात येतो.

  • Share this:

विमानातून पहिल्यांदा प्रवास करताना अनेकजण चिंताग्रस्त असतात. विमानात जाताना नक्की काय घेऊन जायचं आणि त्यासाठीची तयारी कशी करायची याबद्दल काही कल्पना नसते. तसेच प्रवासा दरम्यान कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला तर काय करावं असाही प्रश्न त्यांच्या मनात असतो.

अशा अनेक गोष्टी असतात ज्या पहिल्यांदा विमानातून प्रवास करणाऱ्यांच्या मनात सतत येत असतात. आज आम्ही तुम्हाला पहिल्यांदा विमानातून प्रवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल सांगणार आहोत. या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचा हा प्रवास नक्कीच अविस्मरणीय होईल.

बस किंवा ट्रेनच्या प्रवासाप्रमाणे विमानातून प्रवास करण्यासाठी 20- 25 मिनिटं आधी पोहचू नका. किंमान एक ते दीड तास आधी पोहोचणं अपेक्षित आहे. विमानतळावर चेकिंग आणि इमिग्रेशनदरम्यान बराच वेळ लागतो.

तुमच्याकडे तिकिटाचं प्रिन्टआउट नक्की ठेवा. कारण एसएमएस वैध मानला जात नाही. यासोबतच स्वतः जवळ आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एखादं आयडी प्रूफ नक्की ठेवा.

ज्या पद्धतीने बस किंवा ट्रेनमध्ये तिकिट घेतल्यावर सीट पकडतो तसं विमानाच्या प्रवासात अजिबात होत नाही. इथे तुम्हाला तिकिटाने नाही तर बोर्डिंग पासने एण्ट्री मिळेल. ज्या एअरलाइनचं तिकीट तुमच्याकडे आहे, त्याचं काउंटर विमानतळावर असतं. तिथे तुम्ही तिकीट दाखवून बोर्डिंग पास घेऊ शकता.

सर्वातआधी तुम्हाला चेक-इन काउंटरवर बोर्डिंग पास आणि आयकार्ड दाखवावं लागेल. चेकिंग प्रोसेसनंतर बॅगेचं वजन तपासून त्यावर टॅग लावून कार्गो सेक्शनमध्ये पाठवण्यात येईल. लँडिंगनंतर तुम्हाला ती बॅग दिली जाईल.

स्वतःसोबत प्रवासादरम्यान धारदार वस्तू, लायटर, ब्लेड, कैंची, स्फोटक सामान विमानात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 11:57 AM IST

ताज्या बातम्या