Research: ज्यांचं व्याकरण खराब त्यांना मिळत नाही प्रेम

75 टक्के पुरूषांनीही मान्य केलं की, ज्या मुलींचं व्याकरण चांगलं असतं अशाच मुलींकडे ते आकर्षित होतात

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 08:56 PM IST

Research: ज्यांचं व्याकरण खराब त्यांना मिळत नाही प्रेम

जोडीदाराचा शोध सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमचं व्याकरण किती चांगलं आहे ते तपासून घ्या. याचं मुख्य कारण म्हणजे, ज्यांचं व्याकरण चांगलं नसतं, त्यांना जोडीदार शोधायला त्रास होतो असं एका संशोधनात म्हटलं गेलं आहे. एवढंच नाही तर तुम्ही कोणाला डेट करत असाल किंवा ऑनलाइन पार्टनर पाहत असाल तरीही आपल्या व्याकरणावर काम करा. यामुळे तुम्ही दुसऱ्या व्यक्तिला अधिक चांगल्यारितीने प्रभावीत करू शकाल.

संशोधनानुसार, जर तुम्ही वाक्य योग्य पद्धतीने लिहित नसाल किंवा शब्दांचा उच्चा योग्य पद्धतीने करत नसाल तर तुम्हाला प्रेम शोधायला फार त्रास होऊ शकतो. जे लोक ऑनलाइन डेटिंग करतात किंवा ऑनलाइन डेटिंगचा विचार करत आहेत, त्यांचं व्याकरण चांगलं असणं अपेक्षित आहे. जर व्याकरण चांगलं नसेल तर तुम्हाला समोरच्या व्यक्तिकडून अपेक्षित उत्तर मिळणार नाही. खासकरून ऑनलाइन डेटिंगमध्ये ही गोष्ट जास्त पाहिली जाते आणि नेमकी याच ठिकाणी लोक सर्वात जास्त चुका करतात.

संशोधनानुसार, मुलींना त्यांच्या जोडीदाराचं व्याकरण चांगलं असावं अशी अपेक्षा असते. संशोधनात भाग घेतलेल्या 88 टक्के महिलांनी म्हटलं की, जोडीदाराची निवड करण्यात व्याकरणाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. तर 75 टक्के पुरूषांनीही मान्य केलं की, ज्या मुलींचं व्याकरण चांगलं असतं अशाच मुलींकडे ते आकर्षित होतात आणि त्या मुलीचा जोडीदार म्हणून विचार करतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

थकवा घालवायचा आहे तर उपवासाचा हा पदार्थ आवर्जून खा!

Loading...

VIDEO: गांधीलमाशी मारण्यासाठी त्याने वापरले फटाके, अखेर घराचं छप्पर जळालं

'या' प्राण्यांना लागते सर्वात जास्त थंडी, तुमच्याकडे आहे का यातला कोणता प्राणी?

VIDEO: अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय, ईडीच्या नोटीसवर राज ठाकरेंच्या पत्नीचा सरकारला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...