उलट्या, चक्कर यांनी प्रवासात होतोय त्रास? 'हे' घरगुती उपाय करून पाहा

उलट्या, चक्कर यांनी प्रवासात होतोय त्रास? 'हे' घरगुती उपाय करून पाहा

प्रवासात उलट्या होत असतील तर घरगुती उपायांनी तुम्ही हा त्रास कायम दूर करू शकता.

  • Share this:

मुंबई, 31 मे : प्रवास करायला सगळ्यांनाच आवडतं. अनेक ठिकाणी फिरून एंजाॅय करायला आवडत असूनही प्रवासात तब्येत बिघडते. याचं कारण गाडी लागणं हा प्रकार. अनेकांना प्रवासात उलट्या होतात, डोकेदुखी, चक्कर येते. अख्ख्या प्रवासात हा त्रास झाला की मग सगळी मजा निघून जाते. तुम्हालाही हा त्रास होतो का? मग तुम्ही घरगुती उपाय करू शकता आणि या त्रासापासून मुक्त होऊ शकता.

तुम्हाला प्रवासात उलट्या होत असतील तर तुम्ही पुदिना जवळ बाळगा. पुदिन्याचा अर्क तुमच्यासाठी फायदेशीर होईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रवास सुरू होण्याआधी पुदिन्याचा रस चहात टाकून तो प्या. यामुळे प्रवासात तुमची तब्येत बिघडणार नाही.

लग्न आणि मुलांशिवाय राहणारी स्त्री असते सर्वात सुखी

अनेकांना वाटतं प्रवासात खिडकी बंद केली तर  हवेपासून तुमचं संरक्षण होईल.  पण तसं होत नाही. उलट खिडकी उघडी ठेवलीत तर ताज्या हवेमुळे त्रास होत नाही.

'या' कारणानं तणाव कमी होण्याऐवजी वाढतोच

बस एसी असते आणि खिडकी उघडणं शक्य होत नाही. अशा वेळी तोंडात लवंग ठेवावी. लवंग ठेवल्यानं मळमळत नाही. उलटी येत नाही.

... म्हणून जोडीदाराशी नेहमी वाद घालत राहा

शिवाय काही गोष्टींची काळजी घेणंही गरजेचं आहे. प्रवासाला निघण्याआधी जास्त जेऊ नका. हलका आहार घ्या. प्रवासात चिप्स वगैरे तर अजिबात खाऊ नका. ज्यांना गाडी लागण्याचा त्रास आहे, त्यांनी ही काळजी घ्यायलाच हवी. शिवाय पाणीही पिऊन निघा.

प्रवासात माऊथ फ्रेशनेस वापरा. ट्रॅव्हलिंग सिकनेससाठीची औषधं घ्या. अर्थात, हे डाॅक्टरांनाच विचारून घ्या.

VIDEO : मोबाईलवर गेम खेळणे पडले महागात, दहावीच्या विद्यार्थ्याचा डोळा निकामी

Tags:
First Published: May 31, 2019 07:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading