Home /News /lifestyle /

2022 मध्ये लग्न करण्याचा विचार करताय, तर 'या' गोष्टी आधी करा, अन्यथा होईल पश्चाताप!

2022 मध्ये लग्न करण्याचा विचार करताय, तर 'या' गोष्टी आधी करा, अन्यथा होईल पश्चाताप!

लग्नाचा सीझन सुरू असून, बॉलिवूड सेलिब्रिटींपासून सामान्य व्यक्तींपर्यंत अनेकांचे विवाह (Marriage) यंदाच्या हंगामात आतापर्यंत झाले आहेत. लग्न हा आयुष्यातला एक मोठा बदल असतो. मुलगा आणि मुलगी या दोघांचं आयुष्य लग्नानंतर बदलून जातं. त्यामुळे लग्नाआधी मुलगा आणि मुलगी दोघांनीही अनेक अर्थांनी तयार असणं गरजेचं आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 4 जानेवारी : लग्नाचा सीझन सुरू असून, बॉलिवूड सेलिब्रिटींपासून सामान्य व्यक्तींपर्यंत अनेकांचे विवाह (Marriage) यंदाच्या हंगामात आतापर्यंत झाले आहेत. लग्न हा आयुष्यातला एक मोठा बदल असतो. मुलगा आणि मुलगी या दोघांचं आयुष्य लग्नानंतर बदलून जातं. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य सांभाळून कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत नियोजनाची गरज अधिकच वाढली आहे. त्यामुळे लग्नाआधी मुलगा आणि मुलगी दोघांनीही अनेक अर्थांनी तयार असणं गरजेचं आहे. अशा काही गोष्टी (Pre-Marriage Tips) आहेत, ज्यांची काळजी मुला-मुलींनी लग्नापूर्वीच घ्यायला हवी. आता तुमचाही लग्नाचा विचार असेल तर या गोष्टी आधी करा, अन्यथा लग्नानंतर (Weddings In 2022) पश्चातापाची वेळ येऊ शकते. लग्नापूर्वी आपल्या जोडीदारासोबत काही काळ रिलेशनशिपमध्ये राहणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे दोघांना एकमेकांना समजून (Characteristics Of Best Partner) घेण्याची संधी मिळते. लग्नानंतर कोणतीही अडचण निर्माण होत नाही. या काळात तुम्ही या व्यक्तीसोबत आपण आयुष्यभर राहू शकतो की नाही, याचा निर्णय घेऊ शकता. तुम्हाला वाटलं, की तुम्ही आयुष्यभर त्या व्यक्तीसोबत राहू शकत नाही, तर अशा परिस्थितीत लग्न न करण्याचा निर्णय घेणं कधीही चांगलं. आपला जोडीदार हा सर्वांपेक्षा वेगळा आणि चांगला असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या जोडीदाराचा इतरांवर प्रभाव पडला पाहिजे, असं त्यांना वाटतं. त्यामुळे लग्नाआधी आपल्या ग्रूमिंगकडे लक्ष द्या. हे ग्रूमिंग मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचं असावं. याबरोबर, लग्नापूर्वी स्वतःला काम करण्याची सवय लावावी. जोडीदारासोबत राहण्याआधी काही काळ एकटं किंवा मित्र-मैत्रिणींसोबत राहावं. यामुळे काम करण्याची सवयही लागेल आणि स्वत:चे आर्थिकदृष्ट्या नियोजन करता येतं. असं केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि एक चांगला अनुभव येईल. लग्नानंतर खर्च वाढतो. त्यामुळे लग्नाआधीच स्वतःला आर्थिकदृष्ट्या मजबूत करावं. तसंच लग्नानंतर अनेक प्रकारच्या कौटुंबिक-सामाजिक जबाबदाऱ्याही वाढतात. अशा परिस्थितीत, संकट काळासाठी थोडा बँक बॅलन्स असणं फायदेशीर ठरतं. लग्नापूर्वी एकदा तुमच्या जोडीदासोबत भांडण करा, यामुळे भांडण झाल्यानंतर तो किंवा ती कसा वागतो किंवा वागते, तसंच समोरची व्यक्ती परिस्थिती कशी हाताळते, हे तुम्ही पाहू शकता. लग्नानंतर मित्र-मैत्रिणींपासून दुरावले जाणार नाही, यासाठी असा एक ग्रुप बनवा, ज्यांना तुम्ही आपल्या कुटुंबासोबतही भेटू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारापासून तोडले जाणार नाही आणि कुटुंबाकडेही दुर्लक्ष होणार नाही. तसंच कुटुंबाला ओळखणारे मित्र कठीण प्रसंगी परिस्थिती पाहून तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात. हा तुमच्यासाठी खूप मोठा आधार ठरतो. एखादा छंद जोपासा. छंद हा तणाव दूर करण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. याचा तुम्हाला लग्नानंतर फायदा होईल. यामुळे तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल आणि तुमच्या जोडीदारालाही स्वत:चा वेळ मिळेल. या गोष्टींची काळजी घेतल्यास, लग्नानंतर तुम्हाला अडचणी येणार नाहीत.
First published:

Tags: Relationship tips

पुढील बातम्या