Home /News /lifestyle /

तुम्हीही बाप होण्यासाठी करताय प्लानिंग, तर पुरुषानं करायला हवी ही तयारी

तुम्हीही बाप होण्यासाठी करताय प्लानिंग, तर पुरुषानं करायला हवी ही तयारी

जसं स्रीला गर्भधारणेसाठी काही तयारी करावी लागते तसंच पुरूषानेही केली पाहिजे. त्यामुळे बाळ आरोग्यवान व्हावं यासाठी दोघांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. बाळ आरोग्यवान होण्यासाठी पुरुषाचे स्पर्म आरोग्यवान असणं अत्यंत गरजेचं असतं.

नवी दिल्ली, 09 डिसेंबर: भारतीय संस्कृतीत लग्न हा संस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन जीवांचं मिलन हा भाग तर आहेच पण पुढे आपलं कुटुंब निर्माण करणं आणि त्यातून समाज उभा करणं ही त्यामागची धारणा आहे. तुम्हीही पुरुष(Men) आहात आणि बाप (Father) होण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जसं स्रीला गर्भधारणेसाठी काही तयारी करावी लागते तसंच पुरूषानेही केली पाहिजे. त्यामुळे बाळ आरोग्यवान व्हावं यासाठी दोघांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. बाळ आरोग्यवान होण्यासाठी पुरुषाचे स्पर्म आरोग्यवान असणं अत्यंत गरजेचं असतं. जे स्पर्म (Quality Sperm) दर्जेदार असतात तेच स्री बीजाशी मिलन करू शकतात. पुरुषाचे जे स्पर्म आकाराने विचित्र आहेत किंवा ज्यांचा दर्जा चांगला नाहीए ते स्पर्म शक्तिशाली नसतात आणि ते स्री बीजाशी मिलन घडवू शकत नाहीत त्यामुळे गर्भधारणा (Fertilization) होऊ शकत नाही. मग आता प्रश्न असा आहे की स्पर्म दर्जेदार कोण करणार? ही जबाबदारी पुरुषाची असते. सध्याची जीवनशैली आणि दिनचर्या शिथिल असल्यामुळे पुरुषांच्या स्पर्मचा दर्जा घसरत चालला आहे. त्यामुळे तुम्ही जर बाप होण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत जेणेकरून तुमचा स्पर्म शक्तिशाली होऊ शकेल आणि तुमचं बाप होण्याचं स्वप्न तुम्ही अस्तित्वात आणू शकाल. वजन नियंत्रणात आणा लाइव्ह सायन्सच्या वृत्तानुसार अभ्यासांतून हे सिद्ध झालं आहे की स्थुल व्यक्तिंच्या स्पर्मच्या दर्जावर त्यांच्या स्थुलपणाचा परिणाम होतो. त्यामुळे ते आपल्या पत्नीला गर्भवती करण्यात अयशस्वी ठरतात किंवा त्यांना मूल व्हायला उशीर होतो. त्यामुळे सर्वांत पहिल्यांदा पुरुषांनी वजन नियंत्रणात आणायला हवं. हेही वाचा- Sweet Potato : रताळे कधीही खाऊन फायदा मिळणार नाही; खाण्यासाठी ही वेळ आहे सर्वोत्तम
 ब्लड प्रेशर,डायबेटिस नियंत्रित करा
हाय ब्लड प्रेशर, डिप्रेशन, एंझायटी, पेन, डायबेटिस याच्या औषधांचा पुरुषांच्या फर्टिलिटीवर परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्हाला हे आजार नसतील तर ते होऊ नयेत याची काळजी घ्या. असतील तर नियंत्रणात ठेवा. ताजं अन्न खा जर तुम्हाला मुलाला जन्म द्यायचा आहे तर तुम्ही ताजं आणि पौष्टिक अन्न खायला हवं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तुमच्या आहारात फळं आणि पालेभाज्यांचं योग्य प्रमाण असायला हवं. अँटिऑक्सिडंट (Antioxidant) असलेले पदार्थ अधिक खावेत. रोज व्यायाम करा दररोज व्यायाम केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि मन ताजंतवानं होतं. तुम्ही जितके आनंदी असाल तितका तुमचा स्पर्म दर्जेदार असतो. त्यामुळे नियमितपणे दररोज (Daily Workout) व्यायाम करा. हेही वाचा-  Skin Care tips : हिवाळ्यातही त्वचा टवटवीत ठेवायची असेल तर या वेळेला लावा Body Lotion
 मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या
तुमच्या दररोजच्या आहारामध्ये मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंटचा समावेश करा. तसं केल्याचे फायदे भरपूर आहेत. व्हिटॅमिन सी आणि ईसोबतच सेलेनियम आणि झिंकचं प्रमाण अधिक असलेलं मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या. त्याचबरोबर त्यामध्ये अँटिऑक्सिडंट असणंही गरजेचं आहे. अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रॉडक्टिव्ह मेडिसीनच्या (American Society for Reproductive Medicine) म्हणण्यानुसार अँटिऑक्सिडंट्स स्पर्मची संख्या वाढवायला मदत करतात.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Health, Lifestyle, Relationship

पुढील बातम्या