चांगल्या झोपेसाठी आजच करा ही कामं...

अनेक दिवस झोप पूर्ण झाली नाही तर मधूमेह, उच्च रक्त दाब आणि लठ्ठपणाच्या समस्या उद्भवू शकतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 08:03 AM IST

चांगल्या झोपेसाठी आजच करा ही कामं...

चांगली झोप येण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजे चिंता मुक्त असणं. जर तुमच्या मनात काही विचार असतील किंवा चिंता असतील तर तुम्ही आराजपणाच्या चक्रव्युहात अडकत जाता. याशिवाय डोळ्यांखाली डार्क सर्कल येणं, एकाग्रता कमी होणं आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. याशिवाय मेंदू योग्य प्रकारे कार्य करण्यास सक्षम राहत नाही. तसेच थकव्यामुळेही झोप पूर्ण होत नाही.

अनेक दिवस झोप पूर्ण झाली नाही तर मधूमेह, उच्च रक्त दाब आणि लठ्ठपणाच्या समस्या उद्भवू शकतात. झोप न येण्याची अनेक कारणं आहेत. मात्र सतत चिंता करत राहणं हे सर्वात मोठं कारण आहे. याशिवाय मनातल्या समस्येबद्दल सतत विचार करत राहिल्यानेही झोप लागत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्या- पिण्याच्या वेळा बदलणं, एकटेपणा, अनेक तास भूक न लागणं, इंटरनेट, टीव्हीच्या आहारी जाणं, चहा- कॉफी जास्त प्रमाणात पीणं, मद्यपान, सिगरेटची सवय अशा अनेक कारणांमुळे झोप लागत नाही.

चांगल्या झोपेसाठीचे उपाय-

झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवावं. तसंच झोपायला जाण्यापूर्वी गोड खाऊ नये.

झोपायला जाण्यापूर्वी सिगरेट ओढू नये तसेच तंबाखू खाऊ नये.

Loading...

झोपायला गेल्यानंतर 15 मिनिटांत जर झोप आली नाही तर, लगेच बेड सोडावा आणि स्वतःला दुसऱ्या कामात गुंतवावं. यावेळी तुम्ही एखादं पुस्तकही वाचू शकता.

झोपायला जाण्यापूर्वी चहा, कॉफी पिऊ नका.

झोपण्यापूर्वी गरम दुधात जायफळाची पावडर टाकून प्यायल्यास चांगली झोप लागते. तुपात जायफळ उगाळून झोपताना डोळ्यांना लावल्यानेही झोप चांगली येते.

एक चमचा जिऱ्याची पावडर पिकलेल्या केळ्यावर लावून खाल्यानंतरही झोप लवकर येते.

तसेच झोपण्यापूर्वी गरम दुधात केशर टाकून प्यायल्यास निद्रानाशच्या त्रासापासून मुक्तता मिळते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

…म्हणून सेक्सनंतर पुरुषांना येते झोप

स्वस्तात फिरून या हे 5 देश!

ऐकावं ते नवल! नवऱ्याचं अतीप्रेम झालं असह्य, पत्नीने केली घटस्फोटाची मागणी

ऑफिसमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी करा हे उपाय, कधी होणार नाही अपयशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 08:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...