मेडिटेशन करताना जर असं काही झालं तर लगेच सोडून द्या ध्यान!

ध्यान साधना ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात मन एकाग्र असणं फार आवश्यक असतं. एकाग्रता असेल तरच तुम्हाला ध्यानसाधनेचा फायदा होतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 07:23 AM IST

मेडिटेशन करताना जर असं काही झालं तर लगेच सोडून द्या ध्यान!

ध्यान साधना ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात मन एकाग्र असणं फार आवश्यक असतं. एकाग्रता असेल तरच तुम्हाला ध्यानसाधनेचा फायदा होतो. मेडिटेशनमुळे फक्त इंद्रिय आणि चक्र जागृत होतात असं नाही तर मनुष्य त्याच्या इच्छांवर आणि आकांक्षांवर नियंत्रण ठेवायला शिकतो.

मेडिटेशनमुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःला नव्याने भेटते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नित्यनियमाने मेडिटेशन केलं तर आयुष्यात निवांतपणा अनुभवता येतो.

अनेकदा असं होतं की ध्यान लावण्याचा कितीदाही प्रयत्न केला तरी त्यात मन लागत नाही. अशावेळी ध्यान करायला बसू नये. थोड्या वेळासाठी ध्यान करणं सोडून दिलं पाहिजे.

मेडिटेशन करताना तुमचं मनही इकडे- तिडके भटकतं का? ध्यानाला बसल्यावर अनेकांच्या मनात नानाविध विचार येत असतात. यात ऑफिस, शेजारी, कुटूंब, मुलं, जेवण, प्रेयसी असे एक ना अनेक विचार मनात येत असतील तर ध्यानाला बसू नये.

सध्याच्या व्यग्र आयुष्यात अनेकांकडे शांतपणे जेवायला आणि कुटुंबासाठीही पुरेसा वेळ नसतो. अशावेळी ध्यानाला बसणं ही फक्त औपचारिकता राहते. जोपर्यंत तुम्ही मन एकाग्र करून ध्यानाला बसत नाही तोवर शक्यतो मेडिटेशन करू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 07:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...