मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

केस रंगवून तरुण व्हायचा विचार करताय? आधी जाणून घ्या याचे धोके!

केस रंगवून तरुण व्हायचा विचार करताय? आधी जाणून घ्या याचे धोके!

फॅशनच्या नावाखाली असंख्य गोष्टी आधुनिक काळात उपलब्ध आहेत. मात्र त्या वापरण्याआधी त्यांच्याबाबत नीट माहिती करून घेणं गरजेचं आहे.

फॅशनच्या नावाखाली असंख्य गोष्टी आधुनिक काळात उपलब्ध आहेत. मात्र त्या वापरण्याआधी त्यांच्याबाबत नीट माहिती करून घेणं गरजेचं आहे.

फॅशनच्या नावाखाली असंख्य गोष्टी आधुनिक काळात उपलब्ध आहेत. मात्र त्या वापरण्याआधी त्यांच्याबाबत नीट माहिती करून घेणं गरजेचं आहे.

    मुंबई, 7 फेब्रुवारी : अनेकजण पांढरे केस (white hairs) लपवण्यासाठी किंवा फॅशन (fashion) म्हणून, लुक (look) बदलण्यासाठी म्हणूनही केस रंगवतात (hair coloring). आज बाजारात विविध किमतीच्या रेंजमध्ये हेअर कलर्स सहजपणे उपलब्ध आहेत. तरुण पिढीमध्ये (young generation) तर विविध रंगांनी केस रंगवणं हे कमालीचं कूल समजलं जातं. मात्र या वरवर साध्यासोप्या वाटणाऱ्या गोष्टीचे अनेक दुष्परिणाम (bad effects) आणि धोके (risks0 आहेत. केस रंगवणे ही तशी साधीसुधी दिसत असली तरी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. या कलर्स मधली रसायनं तुमच्या केसांचं आरोग्य (health) नेहमीसाठी खराब करू शकतात. तुम्ही केस रंगवणार असाल तर आधी हे धोके नीटपणे जाणून घ्या. जळजळ आणि ऍलर्जी (allergy) केसांच्या रंगात काही असे घटक असू शकतात, जे डोक्याच्या त्वचेला मानवणार नाहीत. या गोष्टी ऍलर्जीचं कारण बनू शकतात. यातून सूज, खाज, जळजळ अशा गोष्टी उद्भवतात. हे ही वाचा-तीन प्रियकरांसोबत मिळून महिलेनं पतीसोबत केलेलं कृत्य वाचून बसेल धक्का केसांची मजबुती कमी होते. केसांच्या रंगात एक हटके असतो तो म्हणजे हायड्रोजन पॅराक्सॉइड हा घटक केसांसाठी अत्यंत घातक असतो. या घटकामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. आणि पुढे तुटतात. केसांचं गळणं (hair fall) तज्ज्ञ सांगतात, की सामान्य केसांपेक्षा रंग दिलेले केस जास्त गळतात. कारण केसांचे रंग हे केसांच्या डायसल्फाईड बॉण्डवर प्रभाव टाकतात. केस या रसायनांच्या संपर्कात आल्यावर कमकुवत, आजारी होतात. दमा (Asthma) असलेल्यांनी रहा सावध तज्ज्ञ सांगतात, की केसांना कलर करण्याच्या प्रॉडक्ट्समध्ये सामान्यतः अमोनिया असतो. यामुळे तुमचे डोळे, फुफ्फुसं आणि श्वसनयंत्रणेला धोका पोचतो. विशेतः श्वास घ्यायला ज्यांना त्रास होतो त्यांनी आणि दम्याचा आजार असलेल्यांनी यापासून अगदी दूर राहिलं पाहिजे असं तज्ञ आणि डॉक्टर्स सांगतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Woman hair

    पुढील बातम्या