मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Chanakya Niti : 'या' विशेष गुण असलेल्या महिलांकडे लवकर आकर्षित होतात पुरुष

Chanakya Niti : 'या' विशेष गुण असलेल्या महिलांकडे लवकर आकर्षित होतात पुरुष

chanakya niti

chanakya niti

आचार्य चाणक्य यांनी स्त्री आणि पुरुष यांच्या नात्याबद्दल देखील बरंच काही सांगितलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई १६ नोव्हेंबर : आचार्य चाणक्य हे नीति शास्त्रामधील मोठे अभ्यासक आहेत. त्यांचा शास्त्राचा खूप मोठा अभ्यास आहे. ते लोकांनी चांगलं आणि आनंदी, तसेच यशस्वी जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे? हे ते नेहमीच सांगतात. शिवाय कुटुंब आणि नात्याबद्दल देखील त्यांनी आपल्या नीतिमध्ये सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी स्त्री आणि पुरुष यांच्या नात्याबद्दल देखील बरंच काही सांगितलं आहे. त्या असे काही विशेष गुण सांगितले आहेत, ज्याकडे पुरुष आकर्षित होतात.

हे ही वाचा : Chanakya Niti: 'या' कारणामुळे वेळे आधीच म्हाताऱ्या होतात महिला

आचार्य चाणक्य यांच्या मते, जर स्त्रियांमध्ये हे गुण असतील तर पुरुष तिच्या चरणी नतमस्तक होतो आणि ती म्हणेल तसं करायला तयार असातो, तसेच पुरुष अशा स्त्रीवर प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू लागतो.

धैर्यवान स्त्री

एखादी स्त्री बघून अशक्त वाटू शकते, पण जर तिने हिंम्मत दाखवली तर ती स्वतःला आणि तिच्या कुटुंबाला अत्यंत कठीण परिस्थितीतून वाचवू शकते. अशी स्त्री वडिलांप्रमाणे आपल्या कुटुंबाचे रक्षण करते आणि मुलींमधील हा गुण पुरुषांना आवडतो, हा एक प्रकारचा अवलंबित्व बनतो की घरात पुरुष नसला तरी घरातील स्त्रिया खंबीरपणे परिस्थितीला सामोरे जातात.

हुशार आणि समंजस स्त्री

आता हे लक्षात घ्या की बुद्धीमान असणे आणि शहाणपण किंवा समंजस असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समजूतदार स्त्री आपल्या जोडीदाराला कधीही अडचणीत आणत नाही आणि कठीण प्रसंगी त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी असते. पुरुषांना अशी स्त्री आवडते आणि अशा स्त्रीयांना लवकरात लवकर मिळवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करतात.

भावनिकता

भावनिक असणं हे दुर्बलतेचं लक्षण मानलं जातं आणि ही महिलांची कमजोरीचं लक्षण असल्याचं म्हटलं जातं, पण भावनाशील स्त्रीच योग्य निर्णय घेऊ शकते. ही अशी स्त्री कधीही स्वार्थी नसते आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करते. म्हणूनच अशी स्त्री आपल्या आयुष्यात यावी असं प्रत्येक पुरुषाला वाटत असतं.

First published:

Tags: Acharya chanakya, Chanakya niti, Marathi news, Wife and husband