Home /News /lifestyle /

High Cholesterol Symptoms: पायांमध्ये जाणवणारे असे त्रास वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे लक्षण असतात, नीट पाहा

High Cholesterol Symptoms: पायांमध्ये जाणवणारे असे त्रास वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे लक्षण असतात, नीट पाहा

पुरुषांमध्ये रक्तदाब इतका असावा -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयोमानानुसार रक्तदाबात बदल होत असतो. पुरुषांमधील वयानुसार, रक्तदाब 120 ते 143 पर्यंत पोहोचू शकतो. वयाच्या 21 ते 25 व्या वर्षी, SBP 120.5 मि.मी. तसेत 25 वर्षांनंतर 50 वर्षांपर्यंत रक्तदाब 115 पर्यंत असावा. याशिवाय 56 ते 61 वयापर्यंत रक्तदाब 143 पर्यंत असावा.

पुरुषांमध्ये रक्तदाब इतका असावा - मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयोमानानुसार रक्तदाबात बदल होत असतो. पुरुषांमधील वयानुसार, रक्तदाब 120 ते 143 पर्यंत पोहोचू शकतो. वयाच्या 21 ते 25 व्या वर्षी, SBP 120.5 मि.मी. तसेत 25 वर्षांनंतर 50 वर्षांपर्यंत रक्तदाब 115 पर्यंत असावा. याशिवाय 56 ते 61 वयापर्यंत रक्तदाब 143 पर्यंत असावा.

High Cholesterol Symptoms: शरीरात तयार होणाऱ्या खराब कोलेस्ट्रॉलमुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्या निर्माण होतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे पायातही दिसू शकतात.

    नवी दिल्ली, 11 मे : वजन आणि पोटाच्या वाढत्या चरबीवरून आपण शरीरात कोलेस्ट्रॉलचा अंदाज घेतो. परंतु, वाढलेले कोलेस्ट्रॉल इतर अनेक मार्गांनी देखील शोधले जाऊ शकते. ही एक प्रकारची चरबी आहे, ज्यामध्ये यकृत त्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात तयार होणाऱ्या खराब कोलेस्ट्रॉलमुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्या निर्माण होतात. तुम्हाला ही बाब जाणून आश्चर्य वाटेल की, उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे पायातही दिसू शकतात, त्यामुळे काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष (High Cholesterol Symptoms in Legs) करू नये. पायांमध्ये दिसणारी उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे कोणती? 1. थंड पाय - झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, हिवाळ्यात पाय थंड पडणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु कडक उन्हाळ्यातही असे होऊ लागले तर समजून घ्या की काहीतरी मोठं बिघडलेलं आहे. असं होणं हे शरीरातील उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे. 2. पायांच्या त्वचेच्या रंगात बदल - उच्च कोलेस्ट्रॉलमुळे, पायांना रक्त पुरवठ्यावर देखील परिणाम होतो, ज्याचा प्रभाव पायांवर स्पष्टपणे दिसून येतो. रक्ताच्या कमतरतेमुळे, पायांच्या त्वचेचा आणि नखांचा रंग बदलू लागतो कारण रक्ताद्वारे ऑक्सिजन आणि पोषक पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. 3. पायात पेटके येणे - रात्री झोपताना अनेकांना पायात पेटके येतात, हे उच्च कोलेस्टेरॉलचे सामान्य लक्षण आहे. याचा अर्थ तुमच्या शरीराच्या खालच्या भागातील नसांना इजा होत आहे. पायाशिवाय तर्जनी, टाच किंवा पायाच्या बोटांमध्येही क्रॅम्प्स येतात, ज्याचा आपल्या झोपेवरही परिणाम होतो. हे वाचा - शिजवलेल्या अन्नावर वरुन कच्चे मीठ घेऊ नये, अन्यथा होऊ शकतो गंभीर आजार 4. पाय दुखणे - जेव्हा जास्त कोलेस्ट्रॉलमुळे पायांना रक्त पुरवठ्यात अडथळा येतो आणि तेथे ऑक्सिजन योग्यरित्या पोहोचत नाही, तेव्हा पायात तीव्र वेदना होतात. पायात जडपणा आणि थकवा जाणवतो. अशा स्थितीत, सामान्य चालणं देखील अवघड होतं. हे वाचा - Horoscope : मानसिक तयारी ठेवा! आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याचा होणार THE END (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Disease symptoms, Health, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या