अख्खं विश्वच शाकाहारी झालं तर...!!!

अख्खं विश्वच शाकाहारी झालं तर...!!!

70 लाख मृत्यू कमी होतील. डायबिटीज, कॅन्सर आणि स्ट्रोकचं प्रमाणही कमी होईल

  • Share this:

08जुलै: जगातल्या फार कमी भागांमध्ये शाकाहार केला जातो .जगातले फार कमी टक्के लोक शाकाहरी आहेत. शाकाहाराचे महत्व आणि फायदे खूप सांगितले जातात. पण खरोखरच जर सारं जगं जर शाकाहारी झालं तर काय होईल? चला जाणून घेऊया.

एका संशोधनानुसार, जर 2050 सालापर्यंत जगातले सगळे लोक शाकाहारी झाले तर जगातले 70 लाख मृत्यू कमी होतील. डायबिटीज, कॅन्सर आणि स्ट्रोकचं प्रमाणही कमी होईल. जगातील 2 ते 3% उपचारावर होणारा खर्च कमी होईल.ऑक्सफर्ड मार्टिन स्कूल फ्यूचर ऑफ फूड प्रोग्राम यांच्या संशोधनानुसार जग शाकाहारी झाल्यास जगातले वायू प्रदूषणही कमी होईल. पण या सगळ्या फायद्यांबरोबर एक तोटाही होईल. तो म्हणजे पशूपालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होईल. त्यांची संस्कृती धोक्यात येईल.

आता जग खरोखर शाकाहरी होईल की नाही माहित नाही पण गेल्या दहा वर्षात भारतात शाकाहाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 2004 साली देशातले 75% लोक मांसाहारी होते तर 2014 साली देशातले 71% लोक मांसाहारी आहेत. चला तर शाकाहाऱ्यांचे प्रमाण जरी वाढले असले तरी देश पूर्णपणे शाकाहारी होतो की नाही हे येणारा काळच ठरवेल.

First published: July 8, 2017, 12:14 PM IST

ताज्या बातम्या